राजरत्न आंबेडकर यांच्या हस्ते प्रज्ञापर्व 2022 पुसद चे थाटात उद्घाटन!

राजरत्न आंबेडकर यांच्या हस्ते प्रज्ञापर्व 2022 पुसद चे थाटात उद्घाटन!

राजरत्न आंबेडकर यांच्या हस्ते प्रज्ञापर्व 2022 पुसद चे थाटात उद्घाटन!

प्रज्ञापर्व 2022 च्या आकर्षक सभा मंचाने आंबेडकर चौक उजाळले!

बातमी, पुसद

राजेश ढोले पुसद प्रतिनिधी

पुसद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती अर्थात प्रज्ञापर्व 2022या सत्राचे उद्घाटन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू,तथा,भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष, राजरत्न आंबेडकर यांच्या हस्ते दि. 8 एप्रिल 2022 रोजी सायंकाळी 7.00 वाजता मोठ्या आनंदमय वातावरणात विधीवत उद्घाटन करण्यात आले.

मागील दोन वर्ष संसर्गजन्य आजारामुळे, आंबेडकर जयंती डिजिटल माध्यमातून साजरी करावी लागली त्याही डिजिटल जयंती ने विक्रम मोडीत क्रमांक एक ची डिजिटल जयंती गणल्या गेली परंतु या वर्षी कोरोणा चा प्रादुर्भाव कमी झाल्याने व महाराष्ट्र शासनाचे नियम शिथील झाल्याने आंबेडकर जयंती प्रबोधनात्मक साजरी करण्याचा मार्ग सुकर झाल्यामुळे या वर्षी पुसद येथील आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने प्रज्ञापर्व 2022 च्या समितीचे गठन करण्यात आले. त्याच अनुषंगाने काल सायंकाळी तीन पुतळा चौक येथे अभिवादन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जय घोषाने, रॅलीची सुरुवात करण्यात आली ,राजरत्न आंबेडकर साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा गगनभेदी घोषणेने परिसर दणाणून गेला शिस्तबद्ध पद्धतीने,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती पुतळा येथे रॅलीचा समारोप करण्यात आला.

प्रज्ञापर्व 2022 समितीच्या च्या आकर्षक सभामांचाचे निर्माण केले होते.सर्वप्रथम, पूज्य भंतेजी,व मा राजरत्न आंबेडकर साहेब यांच्या हस्ते प्रज्ञा पर्व 2022 चे विधीवत उद्घाटन करून दीप प्रज्वलित करण्यात आले, भगवान गौतम बुद्ध, धम्म नायक सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता सावित्रीबाई फुले या महापुरुषांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

प्रज्ञापर्व 2022 समिती कार्यकारणी च्या वतीने राजरत्न आंबेडकर यांचे गुलाबी पुष्पहाराने संयुक्त स्वागत करण्यात आले.

या ठिकाणी धम्म भूषण पुरस्कार प्राप्त, ज्येष्ठ आंबेडकरी नेते, भीमराव दादा कांबळे, सुरेखा ताई भीमराव कांबळे व, प्रज्ञा पर्व 2022 चे कार्याध्यक्ष, अशोक भालेराव यांचा सपत्नीक मा. राजरत्न आंबेडकर यांच्या हस्ते, शाल, व प्रज्ञापर्व समिती सन्मानचिन्ह,देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला.तसेच

कोरोणा काळात जिवाची पर्वा न करता नागरिकांना मदत करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ता, सुरेश कांबळे, राजेश ढोले, कैलास श्रावणे इत्यादींचा कोविड योद्धा म्हणून, राजरत्न आंबेडकर यांच्याच हस्ते सत्कार करण्यात आला.

बौद्धांना कोण वाचू शकत असेल तर तो म्हणजे केवळ आणि केवळ बुद्धाचा धम्म आपल्याला वाचवू शकतो, असे उदगार उद्घाटकीय भाषणदरम्यान राजरत्न आंबेडकर यांनी केले ते पुढे म्हणतात की आपण बौद्धांनी अनिष्ट रूढी, अंधश्रद्धा सोडून बुद्ध धम्माच्या मार्गाने गेले पाहिजे, बाबासाहेबांनी 1956 साली दिलेल्या धम्मदीक्षेचे परिवर्तन झाल्यासारखे होईल आणि आपणास विश्वातील 135 देशाचे सहकार्य मिळू शकेल या पुढे आपण अतिरिक्त खर्च न करता बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या मातृ संघटनेला आर्थिक स्वरुपात मदत केली पाहिजे असे आवाहनही याप्रसंगी केले त्यांचे अडीच तास चाललेल्या या उद्घाटकीय भाषणाला प्रेक्षकांनी भरभरून टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद दिला.

पुसद शहरामध्ये पहिल्यांदाच राजरत्न आंबेडकर यांच्या भाषणाच्या शैलीने बाबासाहेबांचा जीवन संघर्ष जसाचा तसा उभा केला आंबेडकरी जनता अगदी शांतपणे हे ऐतिहासिक भाषण ऐकत होते वेळोवेळी टाळ्यांच्या प्रतिसाद मिळत होता

अतिशय परखड व अभ्यासपूर्ण अशा भाषणाने सुरुवात करीत समारोप करताना राजरत्न आंबेडकर महणाले की बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या मातृ संस्थेला आपल्या दैनंदिन कमाईचा विसावा हिस्सा धम्म दान करा त्यासाठी त्यांनी बँकेचे अकाउंट नंबर देऊन भावनिक असे आवाहन केले आपण दिलेल्या दानामुळे,बौद्ध युनिव्हर्सिटी, विद्यालय, हॉस्पिटल, अश्या प्रकारचे बौद्धांचे अस्तित्व निर्माण करू शकू असे शेवटी म्हणाले. यानंतर पूजेनिय भंते धम्मसेवक व त्यांचा भिखु गण यांनी आशीर्वाद गाथा सादर केली.

या उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक, प्रज्ञाप्रव समितीचे अध्यक्ष, विठ्ठलराव खडसे सर यांनी केले. तर सूत्रसंचालन, दीपक भवरे व आभार प्रदर्शन राजेश ढोले यांनी केले.

या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती,भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर, पूजनिय भदंत धम्मसेवक, भंते कमाल धममो, माताजी धम्मदीना, ज्येष्ट आंबेडकरी,कार्यकर्ते, भीमराव दादा कांबळे, सुरेखा,भीमराव कांबळे , आनंद भगत यवतमाळ, प्रा. विलास भवरे, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा अध्यक्ष, विनोद इंगोले इंगोले, विशाल धबडगे, मिलिंद हट्टेकर, किशोर मुजमुले, गणेश वाठोरे , अग्मे सर सुरेश कांबळे अरुण कांबळे इत्यादी होते. हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रज्ञा पर्व2022 समितीचे अध्यक्ष, विठ्ठल खडसे, उपाध्यक्ष राजेंद्र नाईक, उपाध्यक्ष राजेश ढोले, कार्याध्यक्ष अशोक भालेराव, सचिव दीपक भवरे, कोषाध्यक्ष नरेंद्र पाटील सर सहसचिव आर पी गवई जनार्धन गजभिये, संघटक संतोष अंभोरे, सहसंघटक सुरज हाडसे, प्रमोद धुळे, नितीन खाडे कैलास श्रावने इत्यादींनी परिश्रम घेतले.

Updated : 9 April 2022 2:43 PM GMT

Shubham Gote

Mr. Shubham Gote is involved in the day-to-day operations of the company along with the business expansion strategies of the print media division of the group. He also supervises the performance of the company in terms of the business plans. He has been on the Board of the Company since November 2009.

Leave a Reply

Your email address will not be published.