युनिक कोचिंग क्लासेस आर्णि येथे 10 वि व 12 वि च्या विध्यार्थ्यांचा निरोप समारंभ पार पडला त्या प्रसंगी कोविड योध्दा शाहरुख शेख यांचा सत्कार

जाकीर हुसेन- 9421302699
१० वि व १२ वि च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ पार पडला त्या प्रसंगी कोविड योद्धा शाहरुख अब्दुल शेख यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार – आर्णी पंचायत समिती चे गटशिक्षणाधिकारी श्री. किशोर रावते सर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला तसेच या प्रसंगी मागील दोन शैक्षणिक सत्रात १० वि व १२ वि मध्ये उत्कृष्ठ गूण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार अड. निखिल सायरे सर (नागपूर हाय कोर्ट) यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व बक्षीस देऊन करण्यात आला या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सौ. शाजिया समीर खान, सौ. रावते मॅडम उपस्थित होते, या प्रसंगी विध्यार्थ्यांना आर्णी पंचायत समिती चे गटशिक्षणाधिकारी श्री. किशोर रावते सर व अड. निखिल सायरे सर व इतर उपस्थित मान्यवरांनी विध्यार्थ्यांना पुढील वाटचालीस खूप मोलाचे मार्गदर्शन केले. व विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना युनिक कोचिंग क्लासेस चे संचालक / शिक्षक गुलाम शेख सर , नावेद सय्यद सर , अबिद सय्यद सर व अजहर खान सर यांचे आभार व्यक्त केले, या प्रसंगी विध्यार्थी, पालक व सर्व मान्यवर करता जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हे या कोचिंग क्लासच्या विद्यार्थिनी प्राची शंकर राठोड (वर्ग -८) व जूबिया निजामोद्दीन शेख (वर्ग ७) यांनी केले , तसेच आभार प्रदर्शन गुलाम शेख सर यांनी केले.