युक्रेन पॅटर्नचे स्वस्त वैद्यकीय शिक्षण लवकरच महाराष्ट्रात..

लातूर/प्रतिनिधी ✍🏻शिरसे प्रवीण
लातूर (शिरूर अनंतपाळ) :–भारताच्या तुलनेत युक्रेनध्ये कमी दरात वैद्यकीय शिक्षण मिळते. त्यामुळे आपल्या देशातील अनेक विद्यार्थी मोठ्या संख्येने तिकडे शिकायला जातात. यात महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे प्रमाणही मोठे असते.मात्र आता तेथील शुल्क आकारणीचा अभ्यास करून तसा बदल महाराष्ट्रात करण्यासंदर्भात राज्य सरकार विचार करणार आहे. त्याबाबत सचिबांना सूचना देण्यात आल्या आहेत, त्यासाठी सक्षम संस्थांच्या प्रस्तावांचा विचार करण्यात येईल असे राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी म्हटले आहे.
कर्नाटकतील एका मेडिकलच्या विद्यार्थ्यांचा युक्रेनमध्ये गोळीबारात मृत्यू झाला. त्याच्या वडिलांशी याबाबत चर्चा केली असता त्यांनी मुलाच्या युक्रेनला जाण्याचे कारण सांगितले. येथील वैद्यकीय शिक्षणासाठीची फीस परवडत नाही. तिकडे किफायतशीर फीस मध्ये शिक्षण मिळते. त्यात इकडे आणखी एक परीक्षा द्यावी लागते.मात्र तरीही हा खर्च परवडतो.असे त्यांनी म्हटले. तेव्हा असा पर्याय आपण,खासगी संस्था मार्फत इकडे का देऊ नये असा विचार समोर आला, असे अमित देशमुख यावेळी म्हणाले. देशमुख पुढे म्हणाले की, युक्रेनच्या किफायतशीर वैद्यकीय शिक्षणातील शुल्क आकारणीची राज्य सरकारकडून दखल घेण्यात आली आहे. त्यानुसार येथील प्रवेश शर्ती आणि शुल्क बदलावर नव्यानेविचार करण्यात येईल. याबाबत राज्याचे सचिव अभ्यास करुन अहवाल सादर करणार आहेत, असे देशमुख यावेळी म्हणाले.आपल्या देशात दर्जेदार शिक्षणाच्या सोयी उपलब्ध असताना विद्यार्थी शिक्षणासाठी परदेशी का जातात? त्याची कारणे तपासली जातील. त्या सुविधा आपल्याकडे उपलब्ध करुन देता येईल का हे पाहण्यात येईल. त्यासाठी राज्य आणि केंद्र सरकार यांना एकत्रित काम करावे लागेल. असे देशमुख यांनी संगितले. मराठवाड्यासह राज्यातील हजारो विद्यार्थी युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी गेले आहेत. मला काही लातूरमधल्या मुलांचे व्हिडिओ आले. त्यानंतर मला कळले कीnयुक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेलेल्यांचीसंख्या एवढी मोठी आहे. हे विद्यार्थी त्यांना देशात आणण्यासाठी विनंती करत आहेत. असे अमित देशमुख यांनी सांगितले. खर्चातील तफावत युक्रेनमध्ये एमबीबीएसच्या शिक्षणासाठी गेलेले आणि नुकतेच परत आलेल्या जालना जिल्ह्यातील तेजस पंडित याने सांगितले की, ‘तिकडे एमबीबीएसच्या शिक्षणासाठी वर्षभरात केवळ अडीच लाख रुपये शुल्क आहे. साडेपाच वर्षांचा एमबीबीएस कोर्स २५ ते ३० लाखांत हॉस्टेल, मेसच्या खर्चासह पूर्ण होतो. आपल्याकडे मात्र साडेपाच वर्षांत कोटीच्या घरात हा खर्च जातो. काय म्हणाले नवीनचे वडील
युक्रेनमध्ये एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. तो मुळचा कर्नाटकातील होता. त्याच्या मृत्यूनंतर त्याचे वडील म्हणाले की, मी सर्व नेत्यांना आणि अधिकाऱ्यांना हे प्रकरण हाताळण्याची विनवणी करतो. भारतातील हुशार विद्यार्थ्यांना बाहेर शिक्षणासाठी जावे लागते. कारण देशात त्यांना मेडिकलचे सीट मिळवण्यासाठी कोट्यवधी रुपये द्यावे लागतात आणि आपल्या विद्यार्थ्यांना कमी पैसे खर्च करून विदेशात समान शिक्षण अथवा यापेक्षा जास्त चांगले शिक्षण मिळते. भारतात कास्टच्या बेसवर जागा अलॉट केल्या जातात. माझ्या मुलाला पीयूसीमध्ये ९७ टक्के होते, तरी देखील तो राज्यात मेडिकल सीट मिळवू शकला नव्हता.