यवतमाळ युवासेने तर्फे थाली बाजाव और खुशीय मानव आंदोलन

यवतमाळ युवासेने तर्फे थाली बाजाव और खुशीय मानव आंदोलन

यवतमाळ युवासेने तर्फे थाली बाजाव और खुशीय मानव आंदोलन

यवतमाळ

राज्यात वाढत्या महागाईने उच्चांक गाठला आहे. यामुळे सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ सुरुच आहे. गॅस सिलिंडरचे भावही वाढले असून सर्व सामान्य माणसाला महागाईची झळ बसत आहे.वाढत्या महागाईला केंद्र सरकार जबाबदार असल्याचा आरोप शिवसेना युवा कार्यकर्त्यांनी केला आहे. याचा निषेध करण्यासाठी आज युवासेनेकडून राज्यभरात थाळी बजाओ आंदोलन करण्यात आलं आहे. राज्यभरात थाळी नाद करत मोदी सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली. युवासेनेकडून यवतमाळ, मधेही थाळी बजाओ आंदोलन करण्यात आलं. यवतमाळ मध्ये बसस्थानक परिसरात युवसेनेच्या वतीने थाळी नाद आंदोलन करण्यात आले आणि मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. वाढत्या महागाईचा निषेध म्हणून मोदी सरकारचे आभार व्यक्त करण्यासाठी ‘थाली बजाओ और खुशिया मनाओ’ हे अनोखे आंदोलन करण्यात आले. थाळी वाजवत मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत युवसेनेतर्फे हे अनोखे आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात ह्या प्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख पराग पिंगळे, जिल्हा प्रमुख राजेंद्र गायकवाड,शहर प्रमुख नितीन बांगर,जिल्हा युवा अधिकारी विशाल गणात्रा,जिल्हा चिटणीस श्रीकांत मिरासे,उपजिल्हा युवा अधिकारी गिरीजनांद कळंबे,तालुका युवा अधिकारी पवन शेंद्रे,शहर युवा अधिकारी निलेश बेलोकर,शहर युवा अधिकारी भूषण काटकर,जिल्हा युवती अधिकारी निमिषा पोपट,हितेश खालपाडा,आकाश चव्हाण,अभिनव वाडगुरे,निरव गढीया,पवन अराठे,प्रफुल गजभे,महेश पवार,आदित्य गंभीरे,अनिकेत थोरात,तुषार देशमुख, निलेश साबळे तसेच सर्व युवासेना,युवतीसेना पदाधिकारी व युवासैनिक उपस्थित होते.

Updated : 3 April 2022 7:36 PM GMT

Shubham Gote

Mr. Shubham Gote is involved in the day-to-day operations of the company along with the business expansion strategies of the print media division of the group. He also supervises the performance of the company in terms of the business plans. He has been on the Board of the Company since November 2009.

Leave a Reply

Your email address will not be published.