यवतमाळ जिल्हा पोलिस अधिक्षक यांना पुसद प्रज्ञापर्व समितीचे निवेदन!

यवतमाळ जिल्हा पोलिस अधिक्षक यांना पुसद प्रज्ञापर्व समितीचे निवेदन!
राजरत्न आंबेडकर यांच्या आगमनापासून ते 14 एप्रिल पर्यंत सुरक्षा प्रदान करण्यात यावी !
राजेश ढोले यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी
बातमी, यवतमाळ
यवतमाळ जिल्हा चे पोलिस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ यांना काल दिनांक, 5 एप्रिल 2022 रोजी, पोलीस मुख्यालय यवतमाळ येथे प्रज्ञापर्व समितीचे शिष्टमंडळ विठ्ठल खडसे सर यांच्या नेतृत्वात सर्व पदाधिकारी यांच्या वतीने कार्यक्रमाची माहिती व निवेदन देण्यात आले.
दि. 8 एप्रिल ते 14 एप्रिल 2022 या सत्रामध्ये धम्म नायक सम्राट अशोक, महात्मा ज्योतिराव फुले, प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती पुसद वतीने आयोजित होणाऱ्या सर्व कार्यक्रमांना,पोलीस विभागाच्या वतीने विशेष सुरक्षा देण्यात यावी याकरिता जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील यांना या प्रमुख आशयाचे निवेदन देण्यात आले.
सविस्तर वृत्त असे की..
दिनांक ८ एप्रिल 2022 रोजी प्रज्ञासूर्य डाँ बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतु मा.उपा. राजरत्न अशोक आंबेडकर साहेब ( *राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा ) हे उद्घाटक म्हणून उपस्थित रहाणार आहेत. तेव्हा आपण दिनांक ८ एप्रिल 2022 रोजी या प्रमुख कार्यक्रमास विशेष सुरक्षा प्रदान करावी.
तसेच मागील 2 वर्षांपासून कोरोना महामारी मुळे जयंती उत्सव साजरा होऊ शकला नाही व यावर्षी प्रज्ञापर्व 2022 चे मुख्य आकर्षक व मार्गदर्शक , डाँ बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतु मा. राजरत्न अशोक आंबेडकर साहेब यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमास समाजबांधवांची उपस्थिती अधिक प्रमाणात असण्याची शक्यता आहे.
म्हणून जयंती उत्सव समितीने दिनांक ८, ९, व १३, एप्रिल 2022 रोजी आयोजित कार्यक्रमास उपस्थित समाजबांधव यांची गौरसोय टाळण्यासाठी डाँ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर पुसद येथे घेण्याचे ठरविले आहे.
उर्वरित कार्यक्रम दिनांक १०, ११, व १२ एप्रिल 2022 चे कार्यक्रम प्रबोधन पत्रिकेत दिल्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज सभागृह जुनी पंचायत समिती पुसद येथे होणार आहेत.
तेव्हा आपणांस धम्मक्रांती प्रज्ञापर्व जयंती उत्सव समिती 2022 व सर्व बहुजन विचारांवर मार्गक्रमण करणाऱ्या सामजिक संघटना तथा पुसद शहर व परिसरातील सर्व समाजबांधव यांच्या वतीने नम्र विनंती की, वरील सर्व कार्यक्रमांस सुरळीत पार पाडण्यासाठी आपण आपल्या पोलिस विभागानी सुरक्षितता देऊन सहकार्य करावे अशा प्रमुख विषयाचे निवेदन यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक, दिलीप भुजबळ पाटील यांना देण्यात आले,निवेदन देतेवेलेस, भारतीय बौद्ध महासभेचे उपाध्यक्ष, आनंद भगत,प्रज्ञापर्व 2022 समिती,चे अध्यक्ष, विठ्ठलराव खडसे, उपाध्यक्ष राजेंद्र नाईक, उपाध्यक्ष राजेश ढोले, कार्याध्यक्ष अशोक भालेराव, सचिव दीपक भवरे, कोषाध्यक्ष नरेंद्र पाटील सर, संघटक संतोष अंभोरे, नितीन खाडे सर, कैलास श्रावणे, इत्यादी ची प्रमुख उपस्थिती होती.