यवतमाळ चेम्बर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज च्या रजतमहोत्सव समारोह द्वारे सर्व व्यापारी ऊर्जान्वित.

यवतमाळ चेम्बर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज च्या रजतमहोत्सव समारोह द्वारे सर्व व्यापारी ऊर्जान्वित.

व्यापारी समुदायानी एकजुट होउन व्यापार करण्याच्या नवीन पद्धतीशी समन्वय करुन स्वाभिमानाने व्यापार करावा असे वक्तव्य यवतमाळ चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज यवतमाळ च्या रजत महोत्सव समारोहात कॉनफीडरेशन ऑफ ऑल इंडीया ट्रेडर्स चे अध्यक्ष श्री बी.सी.भरतियांनी व्यक्त केले.

राधामंगल कलर्स ईन येथे भरगच्च सभागृहात विदर्भाच्या प्रत्येक जिल्ह्यातुन निमंत्रित केलेले व यवतमाळ जिल्ह्यातील तालुका व यवतमाळ शहराचे चेंबरचे पदाधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते. तसेच चेंबर ला सतत सहयोग करणारे टॅक्स प्रॅक्टीशनर आणि सामाजिक संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. व्यापाऱ्यान मधे चेतना जागृत करण्यासाठी रजत महोत्सव समारोहाचे आयोजन करण्यात आले होते.सरकार ला निःशुल्क कर संकलन करुन देणारा व्यापारी आपल्या अस्तित्वाचा लढा लढत आहे. यातुन मार्ग काढणे सोपे आहे. एकजुट होणे,समन्वय वाढविणे,स्वाभिमान जपणे आणी काळानुरुप व्यापार पद्धत अवलंब करणे. व्यापारी वर्गाला नैसर्गिक आपत्ती पासुन संरक्षण मिळावे म्हणुन नैसर्गिक आपत्ती समीती स्थापन्याची मागणी कँट नी केल्याचे भरतियाजिन्नी सांगितले. रजतमहोत्सव समारोहाचा शुभारंभ भरतियाजी,नाग विदर्भ चेंबर चे अध्यक्ष अश्विन मेहाडियाजी आणि यवतमाळ चेंबरचे अध्यक्ष अरुणभाई पोबारु यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुन करण्यात आला. प्रमुख पाहुण्याचा स्वागतानंतर विदर्भाच्या विभिन्न जिल्ह्यातुन व यवतमाळ जिल्ह्याच्या तालुक्यातुन आलेल्या व्यापारी प्रतिनिधीचे स्वागत पुष्प गुच्छ व स्मृतीचिन्ह देउन करण्यात आले. अरुण भाई पोबारूंनी सर्व उपस्थिताचे शब्दसुमनाने स्वागत करुन 25 वर्षात केलेल्या सहयोगाचे आभार मानले. 25 वर्षात चेंबर नी केलेल्या कार्याचा आढावा व प्रस्तावना पावर पाईंट प्रजेंटेशन द्वारे चेंबरचे उपाध्यक्ष मधुसुदन मुंधडा यानी केले. PPT कार्यकारीणी सदस्य राजेश्वर निवल यांनी तयार केले होते. शासकीय नियमाचा वाढता दबाव व आँनलाइन कंपन्याचा त्रास या कारणाने व्यापारी डबघाईस येत आहे. नवीन तंत्रज्ञान वापरुन व्यापार करावा हा सुत्र विशेष अतिथी अश्विन मेहाडियांनी दिला व सरकार नी पारंपारिक व्यापाराला संरक्षण द्यावे असे प्रतिपादन केले. रजतमहोत्सव प्रसंगी यवतमाळ चेंबरचे अभिनंदन करुन अमरावती महानगर चेंबरचे अध्यक्ष सुरेश जैन यानी कौतुक केले. तसेच चंद्रपुर चे रामकिशोर सारडा, वाशिम चे रमेश बज,वर्धा चे मोरेश्वर काशीकर यानी समयोचित प्रतिपादन केले. कर सलाहकार संघटन आणि सी.ए.असोसिएशन नी नेहमी यवतमाळ चेंबरला मार्गदर्शन केल्या बद्दल त्यांचे मानचिन्ह देउन सत्कार करण्यात आला. तसेच वेळ प्रसंगी हक्काची जागा उपलब्ध करुन देणारी संस्था महाजन वाडी,टिंबर भवन,महेश भवन,केमिस्ट भवन व जलाराम मंदीर चा सत्कार स्मृती चिन्ह प्रदान करुन करण्यात आला. जी सेवा पारंपारिक व्यापारी देउ शकतात ती सेवा आँनलाईन ई कामर्स कंपन्या किंवा माँल्स देउ शकत नाही हे ग्राहकानी समजुन घ्यावे व योग्य प्रकारे खरेदी कोठुन करावी हा निर्णय घ्यावा हे विचार ज्येष्ठ सी.ए.प्रकाश चोपडा यानी व्यक्त केले. खुल्या चर्चा सत्रात आलेल्या प्रतिनिधीनी चेंबरचे कौतुक करुन आपले विचार मांडले. रजतमहोत्सवाचे प्रकल्प प्रमुख जगदीश शर्मा व मनीश मोर चा सत्कार बी.सी.भरतियांचा हस्ते करण्यात आले. सर्व पाहुण्याचे व देणगीदाराचे आभार राजेश्वर निवल यानी मानले. रजत महोत्सव समारोहाचे सुरेख संचालन चेंबरचे उपाध्यक्ष राजेंद्र निमोदियांनी केले. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी सर्व कार्यकारिणी सदस्यांनि मोलाचे योगदान दिले. राष्ट्रगीत व भारतमाता च्या जयघोषाने कार्यक्रमाची सांगता करण्या आली.

Updated : 8 March 2022 8:00 AM GMT

Shubham Gote

Mr. Shubham Gote is involved in the day-to-day operations of the company along with the business expansion strategies of the print media division of the group. He also supervises the performance of the company in terms of the business plans. He has been on the Board of the Company since November 2009.

Leave a Reply

Your email address will not be published.