यंग चंदा ब्रिगेडचा आणखी एक कर्तव्यदक्ष पराक्रम

आरती आगलावे
चंद्रपुर तालुका प्रतिनिधि
मो.95112 04862.
आज दि.27.1.2021.ला विठ्ठल मंदिर वार्ड चहारे वाडी येथे यंग चांदा ब्रिगेड चे अध्यक्ष माननीय किशोर भाऊ जोरगेवार यांच्या नेतृत्वात बोरिंग देण्यात आली या कार्यक्राअंतर्गत भूमी पूजन करण्यात आले.श्रीमती विमलताई यांच्या शुभहस्ते कापून भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
उन्हाळा चालू होताच पाण्याची टन्चाई भासत असते त्यामुळे महिलांना उन्हेत भटकावे लागते या गोष्टीची नोंद घेऊन आमदार साहेबांनी प्रत्येक वार्ड मध्ये हात बोरिंग ची सोय करून देण्याचा प्रयत्न केला. खुप धन्यवाद साहेब अशी घोषणा वार्ड वासीयांनी केली. त्या ठिकाणी उपस्थित असंख्य महिला होत्या. यंग चांदा ब्रिगेड सामाजिक संस्थेच्या बहुजन समाज पार्टी च्या अध्यक्ष विमल ताई काटकर, वार्ड संघटिका सौ. आरती ताई आगलावे, सरिता चेतुलवार, माधुरी फाले, मंगला रेहपाडे, शारदा पिंपडे, पल्लवी ठोंबरे, कौसल्या ताई पडगेलवार, विद्या मुमडवार, सिंधू ताई फाले, इत्यादी अनेक महिला उपस्थित होत्या त्यांनी भूमी पूजन करून बोरिंग ला भरपूर पाणी लागावं अशी प्रार्थना पन केली.