मोहम्मद रिझवान , टॅमी ब्यूमाँट वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटू

मोहम्मद रिझवान , टॅमी ब्यूमाँट  वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटू

दुबई – आयसीसीने नुकतीच  क्रिकेट मधील सर्वोत्तम खेळाडूंची घोषणा केली. २०२१च्या क्रिकेट हंगामात  आयसीसीच्या टी-20 प्रकारात पुरूष विभागात पाकचा यष्टीरक्षक आणि फलंदाज मोहम्मद रिझवान आणि महिलांच्या विभागात इंग्लंडची टॅमी ब्यूमाँट यांची सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून निवड करण्यात आली आहे.

 पाकिस्तान क्रिकेटपटू मोहम्मद रिझवानची कामगिरी 
– पाकच्या मोहम्मद रिझवानचे यष्टीरक्षण दर्जेदार
–  दक्षिण आफ्रिकेविरूद्ध टी-20 प्रकारात आपले पहिले शतक
– टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सर्वाधिक धावा जमविणाऱया फलंदाजीच्या यादीत तिसऱया क्रमांकावर
– भारताविरूद्धच्या सलामीच्या सामन्यात रिझवानने 55 चेंडूत नाबाद 79 धावा झळकविल्या

तर इंग्लंडची महिला क्रिकेटपटू ब्यूमाँटने 2021 च्या कालावधीत टी-20 प्रकारात 29 सामन्यात 1326 धावा जमविल्या असून ती सर्वाधिक धावा जमविणाऱया क्रिकेटपटूंच्या यादीत तिसऱया स्थानावर आहे.. महिलांच्या विभागात इंग्लंडच्या ब्यूमाँटने न्यूझीलंडविरूद्धच्या मालिकेत तीन सामन्यांत 102 धावा जमवित मालिकावीराचा बहुमान मिळविला. तसेच तिने भारताविरूद्धच्या सामन्यात अर्धशतक झळकविले होते.

Shubham Gote

Mr. Shubham Gote is involved in the day-to-day operations of the company along with the business expansion strategies of the print media division of the group. He also supervises the performance of the company in terms of the business plans. He has been on the Board of the Company since November 2009.

Leave a Reply

Your email address will not be published.