मोठा अपघात टळला! पुण्यात बांधकामाच्या सळया घेऊन जाणारा कंटेनर तोल सुटल्याने पीएमपीला धडकला

मोठा अपघात टळला! पुण्यात बांधकामाच्या सळया घेऊन जाणारा कंटेनर तोल सुटल्याने पीएमपीला धडकला

पुणे – सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत छत्रपती संभाजीनगर येथे एक मोठा जीवघेणा अपघात होता होता टळला. बांधकामाच्या सळया घेऊन जाणारा मोठा कंटेनर चढावर तोल सुटल्याने सरळ मागे आला. मात्र त्या मागोमाग असलेल्या पीएमपी बसला धडकल्याने तो थांबला. अन्यथा कंटेनर मागील छोट्या वाहनांवर तसेच पादचाऱ्यांच्या अंगावरुन गेला असता. मग परिस्थिती मात्र भिषण झाली असती. दरम्यान सहकारनगर पोलिसांशी संपर्क साधला असता, त्यांनी अद्याप अपघाताची नोंद झाली नसल्याचे सांगितले.

प्रत्यक्षात घटनास्थळावरील नागरिकांनी दिलेल्या माहितीनूसार, सोमवारी सुयोग हॉस्पिटल समोरील चढाव एक मोठा स्टील ने भरलेला कंटेनर ब्रेक फेल झाल्यामुळे पाठीमागील असलेल्या पीएमटी येऊन धडकला. यामध्ये पीएमपी बसचे खुप मोठे नुकसान झाले तर ड्रायव्हर गंभीर जखमी झाला. आतील प्रवाशांना मात्र काहीही झाले नाही. मात्र अपघातामुळे प्रवाशी घाबरलेले होते. पीएमटी जर नसती तर कंटेनर गाडी वेगात पाठीमागे येऊन रस्त्यावरील छोट्या वाहनांना आणि पादचाऱ्यांना चिरडत गेली असती.

यामध्ये मोठी मनुष्य हानी झाली असती. नागरिक तसेच सामाजीक कार्यकर्त्यांनी या रस्त्याचा उतार कमी करण्यासाठी अनेक वेळा पुणे महापालिका प्रशासनाला साकडे घातले आहे. मात्र अधिकाऱ्यांना सांगून काही फायदा होत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. उतार कमी करण्याच्या कामाचं बजेट मोठ असल्यामुळे आणि दोन प्रभागांच्या हद्दीवरचा रस्ता असल्यामुळे कोणताही नगरसेवक याकडे लक्ष देत नाही. आज जर काही अघटित घडले असते तर त्याची जबाबदारी कोणाची ? असा प्रश्‍न नागरिक विचारत आहेत. या संदर्भात अनेक वेळा निवेदन देऊनही काम होत नसल्यामुळे आजही अपघाताची परिस्थिती ओढवलेली आहे. याही पुढे अशा प्रकारचे मोठे अपघात याठिकाणी होऊ शकतात याची गंभीर दखल पुणे मनपा आयुक्तांनी घेतली पाहिजे.

Shubham Gote

Mr. Shubham Gote is involved in the day-to-day operations of the company along with the business expansion strategies of the print media division of the group. He also supervises the performance of the company in terms of the business plans. He has been on the Board of the Company since November 2009.

Leave a Reply

Your email address will not be published.