मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात निल गाईचा पिल्लू ठार, रांगी येथील घटना

धानोरा तालुका प्रतिनिधी दिवाकर भोयर मो.न.9421660523
दिनांक 4 मार्च 2022 च्या सकाळी 7 वाजताच्या सुमारास येथील तलाव परिसरात मोकाट कुत्र्यांनी निल गाईच्या पिल्लाला ठार मारल्याची घटना घडली.
सकाळच्या सुमारास जंगल परिसरातून मोकाट कुत्र्यांनी निलगाईच्या पिल्याचा पाठलाग करत तलाव परिसरात आले. काही मोकाट कुत्रे निलगाईच्या पिल्लाची शिकार करत आहेत असे रांगी चे क्षेत्र सहायक श्री संजय रामगुंडावर यांना माहिती मिळताच वन कर्मचारी घेऊन घटना स्थळी पोहचले, मात्र तो पर्यंत निलगाईचा जखमी पिल्लू ठार झालेला होता. ठार झालेला निलगाईचा पिल्लू अंदाजे दीड वर्षाचा होता असे क्षेत्र सहाय्यक संजय रामगुंडावार यांनी माहिती दिली. त्यानंतर घटना स्थळाचा पंचनामा करून मृत पिल्लाला फॉरेस्ट अफिस मध्ये आणण्यात आले.
या घटनेच्या वेळी रांगी चे क्षेत्र सहायक श्री संजय रामगुंडावार, उत्तर रांगीचे वनरक्षक दिलीप ढोरे, जांभळी बिटचे वनरक्षक सचिन तोराम, निमनवाडा बिटचे वनरक्षक गिरीधर कोडाप, तसेच चौकीदार दामोदर सहारे, सुकरू उसेंडी, तसेच गावकरी उपस्तीत होते.