मृत रेखा पुट्टेवार यांना आर्थिक मदत द्या ! गुरुदेव युवा संघाची मागणी

मृत रेखा पुट्टेवार यांना आर्थिक मदत द्या !

गुरुदेव युवा संघाची मागणी

यवतमाळ : शॉर्टसर्किटमुळे अंगावर विद्युत प्रवाह कोसळल्याने मृत पावलेल्या मृत रेखा पट्टेवार यांना आर्थिक मदत जाहीर करा, अशी मागणी गुरुदेव युवा संघाने जिल्हाधिकारी,तहसीलदार व विद्युत महामंडळाकडे केली आहे.

मृत रेखा पुट्टेवार यांच्या घराशेजारी असलेल्या कनेक्शन बॉक्समध्ये ३० मार्चला शॉर्टसर्किट झाला यात पुट्टेवार यांचा होरपळून मृत्यू झाला. त्या अंत्यविधीचे साहित्य विकून आपल्या कुटूंबियांचा उदरनिर्वाह करीत होत्या मात्र या घटनेत त्यांच्या दुकानातील अंत्यविधीचे साहित्य जळून खाक झाले.

या घटनेला महावितरण कंपनी जबाबदार असल्याचा आरोप गुरुदेव युवा संघाने केला आहे. रेखा यांच्या जाण्यानंतर त्यांचे कुटूंबीय उघड्यावर पडले त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी व त्यांना १५ लाखाची आर्थिक मदत दिली जावी,अशी मागणी संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार व वीज वितरण विभागाकडे निवेदनातून केली आहे.

गुरुदेव’कडून सांत्वन

मृत रेखा पुट्टेवार यांच्या निधनाला आज ३ दिवस उलटून गेले मात्र अद्याप लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी वा वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंत्यांनी पुट्टेवार कुटूंबियांच्या घरी भेट दिली नाही, त्यांनी किमान माणुसकी जपायला पाहिजे होती, असा सूर परिसरातून उमटत आहे. मात्र गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी त्यांची शुक्रवारी भेट घेत सांत्वन केले सोबतच न्याय मिळवून देण्यास आपल्या पाठीशी असल्याचे आश्वासनही गेडाम यांनी दिले.

मृत रेखा पुट्टेवार

विद्युत पुरवठा खंडित करण्यास उशीर

आगीला विझविण्यासाठी स्थानिक नागरिकांसह अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न केले आहे.मात्र आगीने रौद्ररूप धारण केल्याने रेखा पुट्टेवार व त्यांच्या साहित्य वाचविण्यात अपयश आले. दरम्यान, वीज वितरणाच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांना मोबाईल फोनव्दारे संपर्क साधून विद्युत पुरवठा बंद करण्याचे सूचित केले परंतु त्यांनी त्यास उशीर केला आणि अप्रिय घटना घडली.

Updated : 2 April 2022 12:22 PM GMT

Shubham Gote

Mr. Shubham Gote is involved in the day-to-day operations of the company along with the business expansion strategies of the print media division of the group. He also supervises the performance of the company in terms of the business plans. He has been on the Board of the Company since November 2009.

Leave a Reply

Your email address will not be published.