मुबारक भाऊ तंवर यांच्यामुळे माणसातला देव माणूस काय असतो हे या परिसरातील जनतेने पून्हा एकदा पाहिले.

मुबारक भाऊ तंवर यांच्यामुळे माणसातला देव माणूस काय असतो हे या परिसरातील जनतेने पून्हा एकदा पाहिले.

माणसातला देव माणूस – मुबारक तंवर

जाकीर हुसेन – 9421302699

दिनांक 9 मार्च ला आयता या गावी हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. श्री. विनोद जयस्वाल यांच्या घरी दोन गॅस सिलेंडरचा स्फोट झाला, यात त्यांची पत्नी सौ. काजल जयस्वाल व त्यांची पाच वर्षीय चिमुकली कु. परी जयस्वाल यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. स्फोट एवढा भयंकर होता की आजूबाजूची गावेही आवाजाने हादरून गेली. विनोद जयस्वाल हे मुंगसाजी माऊली च्या पुण्यतिथी निमित्त धामणगाव देव येथे दर्शनास गेले होते, अशातच ही दुर्दैवी घटना घडली. अशा या गंभीर परिस्थितीत जाती धर्म, पक्षपात न पाहता मुबारक भाऊ तंवर हे देवासारखे धावून आले. घटना घडल्यानंतर मुबारक भाऊ तंवर यांना घटनास्थळावरून कॉल्स आलेत, कॉल्स येताच मुबारक भाऊंनी धावपळ करण्यास सुरुवात केली त्यांनी तहसिलदार, ठाणेदार, आरोग्य विभाग ते अग्निशामक दल यांच्यापर्यंत कॉल करून त्यांना विस्तृत माहिती दिली व त्यांनतर स्वतःची गाडी घेऊन ते अवघ्या काही मिनिटांताच घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी शेकडो लोकं तिथे मदतीकरीता उभे होते काही लोक आजुबाजुच्या घरावरती कशाचीही तमा न बाळगता पाणी टाकून आग विझविण्याचा सर्वतोपरीने प्रयत्न करत होते. तिथल्या लोकांनी मुबारक तंवर भाऊंना सांगितले की मुलीला निसार नावाच्या मिस्त्रिने बाहेर काढले परंतू गर्भवती स्री अजूनही आतच आहे हे कळताच क्षणाचाही विचार न करता मुबारक भाऊ तंवर हे धाडधीड आत शिरले. परिस्थिती इतकी भयावह होती की तिथे उपस्थिती लोकांचीही हिम्मत होत नव्हती की आपण आत शिरावे कारण घराच्या संपूर्ण भिंती गरम होत्या, त्यातच टिनावरून गरम पाणी खाली पडत होते, टिनपत्रे आगीने पूर्णपणे वाकले होते, लाकडी फाट्याचे निव्वे झाले होते व आत अजूनही सिलेंडर होते ज्याची स्फोट होण्याची शक्यता होती अश्या गंभीर परिस्थितीत मुबारक भाऊ तंवर न डगमगता स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आत शिरले व त्यांनतर आत गेल्यावर काजल जयस्वाल यांच्या शरीराला हलवून पाहिले कदाचित जिवंत असेल तर लवकर दवाखान्यात नेता येईल परंतू तोपर्यंत खूप उशीर झाला होता मग मुबारक भाऊंनी काही लोकांना बाहेरून चादर आणायला सांगितले , लोकांनी दोन तीन चादरी अवघ्या काही क्षणातच आणून मुबारक भाऊ तंवर च्या हाती दिल्या त्या चादरी भाऊंनी मृत काजलच्या शरीरावर टाकल्या‌ , त्यानंतर घराबाहेर उभ्या असलेल्या शेकडो लोकांत आवाज दिला दोघे तिघे माझ्यासोबत घरात या काजल ला बाहेर उचलून आणायला, त्याचवेळी तिथे उभे असलेले कवठा गावाचे मधूकर ठाकरे , आयता येथील गोलू अशोक जोगमोडे, रवि टेंगल यांनी क्षणाचाही विलंब न मुबारक भाऊ सोबत आत गेले आणि मृतक काजल ची बाॅडी उचलून बाहेर काढली .

काजल ही गरोदर असल्याने तिचे पोस्टमॉर्टम करण्यासाठी बॉडी यवतमाळला प्रशासन पाठविनार होते परंतू मुबारक भाऊं तंवर यांनी आर्णी ग्रामीण रूग्णालयाच्या वरिष्ठांसोबत मोबाईल वरून बोलने केल्यामुळे पोस्टमॉर्टम आर्णीलाच करण्यात आले. मुबारक भाऊं तंवर च्या या बहादुरीची व हिमतीची आयता गावातच नव्हेतर परिसरातील सर्वच गावांमध्ये वाहवाह होत आहे.

मुबारक भाऊ तंवर ईथेच थांबले नाही तर दुस-या दिवशी सकाळी 9 वाजता विधान परिषदेचे माजी आमदार ख्वाजा बेग साहेबांना व गॅस सिलिंडर कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना घेऊन आयता येथील घटस्थळाची पाहणी करायला लावली.

तसेच आग विझविताना व गॅस सिलेंडर च्या स्फोटाने जखमी झालेल्या पप्पु तांबटकर,अतुल भेदुरकर,बंडू वाघमोडे , प्रणय गजानन जोगमोडे यांच्या घरापर्यंत ख्वाजा बेग साहेबांना नेवून त्यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची आस्थेने विचारपूस केली.

मुबारक भाऊ तंवर यांच्यामुळे या गंभीर परिस्थितीत गावातील लोकांना धिरही मिळाला. माणसातला देव माणूस काय असतो हे या परिसरातील जनतेने पून्हा एकदा पाहिले.

एक कार्यकर्ता, समाजसेवक, लोकप्रतिनिधी कसा असावा हे मुबारक भाऊं तंवर यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले.

एवढेच नाही तर एका स्थानिक पत्रकाराला याप्रकरणी मुलाखत देताना आयता येथील आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी गावातील सरपंच, उपसरपंच,सदस्य, पोलीस पाटील, गावातील सर्वच युवकांनी आणि महिलांनी सर्वतोपरी प्रयत्न केल्यानेच संपूर्ण गाव आगीपासून वाचले अशी प्रतिक्रिया देऊन स्वताला प्रसिध्दीपासून दूर ठेवले.

लोकांची जाती धर्म, समाज, गटतट, पक्ष न पाहता मानवतेच्या दृष्टिकोनातून मुबारक भाऊं तंवर यांनी जी मदत केली ती आयता पासून ते पूर्ण परिसरात चर्चेचा विषय ठरला.

Updated : 11 March 2022 5:25 AM GMT

Shubham Gote

Mr. Shubham Gote is involved in the day-to-day operations of the company along with the business expansion strategies of the print media division of the group. He also supervises the performance of the company in terms of the business plans. He has been on the Board of the Company since November 2009.

Leave a Reply

Your email address will not be published.