मुकूटबनचे तत्कालीन ठाणेदार व दोन कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी अंतिम टप्प्यात

मुकूटबनचे तत्कालीन ठाणेदार व दोन कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी अंतिम टप्प्यात

● रेतीचा ट्रॅक्टर पकडून ५० हजाराची लाच घेतल्याचे प्रकरण

● अप्पर जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात साक्षदारांची झाली बयाने

● कार्यालयात ट्रॅक्टर चालक जाऊनही बयान न घेता आला परत

तालुका प्रतिनिधी, झरी:– मुकूटबनचे तत्कालीन ठाणेदार धर्म सोनुने सहायक फौजदार ऋषी ठाकूर व सुलभ उईके यानी मुकूटबन येथीलच हॉटेल व्यावसायिक दीपक उदकवार यांचा रेतीचा ट्रॅक्टर २२ जून २०२१ ला सकाळी ६ वाजता पकडून पोलीस स्टेशनला लावला. दीपक उदकवार यांच्या कडे बांधकाम सुरू असल्याने रेतीची आवश्यकता असल्याने मजुरांना रेती आणण्याकरीता सांगितले होते. चालक व मजूर रेतीचा ट्रॅक्टर घेऊन येत असताना येडसी गावाजवळ तत्कालीन ठाणेदार सोनुने व सहाय्यक फौजदार ऋषी ठाकूर पकडला.

रेतीच्या ट्रॅक्टर सोबत चालक व मजूर सर्वांना ठाण्यात नेले. १० वाजत दरम्यान तत्कालीन ठाणेदार सोनुने व ठाकूर यांनी ट्रॅक्टर मालक दीपक उदकवार याना पोलीस स्टेशनमध्ये बोलाविले व ट्रॅक्टर ,मालक व चालकांवर कार्यवाही न करण्या करीता धर्मा सोनुने व ऋषी ठाकूर यांनी १ लाखाची मागणी केली. १ लाख रुपये न दिल्यास महसूची कार्यवाही व आम्ही गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली. १ लाख रुपये देण्यासकरिता मध्यस्ती सोनुने यांचा तत्कालीन रायटर सुलभ उईके यांनी फोनवरून बातचीत करून ५० हजारात तडजोड केली व ट्रॅक्टर मालकावर गुन्हे दाखल न करण्याचे ठरले. भीती व बदनामी पोटी दीपक ५० हजार देण्यास तयार झाला.

तडजोडीतील ५० हजाराची रक्कम आणण्याकरिता सोनुने व ठाकूर यांनी दीपक यांच्या हॉटेल मध्ये नितीन मोहितकर नामक होमगार्डला पाठविले. दिपकच्या पत्नीकडून ५० हजार रुपये घेतून सोनूने याना ठाण्यात नेऊन दिले. तडजोडी बाबत व होमगार्डला ५० हजार दिल्याचे फोन रेकॉर्डिंग व पुरावे दीपक उदकवार यांच्या जवळ होते. तत्कालीन ठाणेदार धर्मा सोनुने व सहाय्यक फौजदार यांनी ५० हजार घेऊनही दीपक विरुद्ध गुन्हा दाखल केला. ५० हजार देऊन सुद्धा तसेच ट्रॅक्टरवर नसतांना खोटा गुन्हा दाखल केल्याने अखेर दीपक उदकवार याने थेट जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली. यावरून जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी धर्मा सोनुने ,ऋषि ठाकूर व सुलभ उईके याना तडकाफडकी निलंबित केले. निलंबित तिघांची विभागीय चौकशी लावली. पहिली चौकशी पांढरकवडा उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी केली तर दुसरी चौकशी अप्पर पोलीस अधीक्षक यांच्याकडे सुरू असून या प्रकरणातील ६ साक्षदारांना अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयात ४ मार्च रोजी १०.३० वाजता साक्ष बयान करीता बोलाविण्यात आले. ६ पैकी ५ जणांचे बयान घेण्यात आले तर ट्रॅक्टर चालकांचे बायन न घेता परत पाठविले याबाबत इतर साक्षदारांनी विचारना केली असता पांढरकवडा येथून चालकाच्या बयाचा कागद आला नसल्यासाने बयान घेण्यात आले नसल्याचे सांगण्यात आले.

पांढरकवडा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातुन तपासाचे सर्वच कागदपत्र आले असतांना चालकाच्या बयानचे कागद का आला नाही अस प्रश्न तक्रारकर्ता दीपक उदकवार व साक्षदारांनी केला. व चालकांचे बयान न घेता परत पाठवून तिघांना वाचविण्याचा प्रयन्त केला जक्त असल्याचा आरोप दीपक उदकवार यांनी केला आहे.चालकाचे बयान न घेतल्यास जिल्हा पोलीस अधीक्षक यांना भेटून तक्रार देणार असल्याचे उदकवार यांनी सांगितले.

. तरी सदर चौकशी अंती जिल्हा पोलिस अधीक्षक हे सोनुने ठाकूर व उईके यांच्यावर के कार्यवाही होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Updated : 8 March 2022 12:33 PM GMT

Shubham Gote

Mr. Shubham Gote is involved in the day-to-day operations of the company along with the business expansion strategies of the print media division of the group. He also supervises the performance of the company in terms of the business plans. He has been on the Board of the Company since November 2009.

Leave a Reply

Your email address will not be published.