माफसु (MAFSU) नागपूर प्रशासना विरूद्ध भाजपा किसन मोर्चा चा एल्गार.

माफसु (MAFSU) नागपूर प्रशासना विरूद्ध भाजपा किसन मोर्चा चा एल्गार.
डॉ.बजाड व प्रा.खेडकर यांच्यावर फोजदरी गुन्हा व निलंबनाची मंगणी, आपहारतील रक्कमही वसूल करा – महेश नाईक.
— डॉ.डी एन बाजड व प्रा.सी.डी.खेडकर(प्राध्यापक , दूग्ध तंत्रज्ञान महाविद्याय वरुड ,पुसद)याना तत्काळ निलंबित करून त्यांच्यावर फोजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा व त्यांनी NAIP प्रकल्पात केलेल्या अपहारा तील रक्कम त्यांचे कडून वसूल करण्यात यावी या प्रमुख मागणी घेऊन भाजपा किसान मोर्चाचे प.विदर्भ संपर्क प्रमुख महेश नाईक यांच्या नेतृत्वात दुग्ध तंत्रज्ञान महाविद्याय वरूड पुसद येथे भाजपाच्या पदाधिकऱ्यांनी धडक दिली.यावेळी किसन मोर्चाच्या वतीने डॉ प्रशांत वासनिक ,सहयोगी अधिषठाता दुग्ध तंत्रज्ञान महाविदयालय,वरूड पुसद यांच्या मार्फत मा.कुलगुरू,महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी MAFSU नागपुर प्रशासनाच्या गलथान कारभाराचा पाढा वाचण्यात आला.२००८ ला भारतीय कृषी अनुसंधान परिषद (ICAR) द्वारा NAIP अंतर्गत हिंगोली व नांदेड जिल्ह्यातील शेती व शेतकऱयांच्या विकासाकरिता ७कोटी २३ लाख ३१हजार ६००रू चा प्रकल्प मंजूर करण्यात आला होता.हा प्रकल्प दुग्ध तंत्रज्ञान महाविदयालय वरूड पुसद मार्फत राबविण्यात आला व या प्रकल्पाचे प्रमुख प्रा.सी.डी. खेडकर यांना नेमण्यात आले होते.पण प्रा.खेडकर यांनी हा प्रकल्प शेतकरी हिताकरिता न राबविता यात स्वहित जोपसल्याचे स्पष्ट होते. यात त्यांनी जवळपास १कोटी ४७ लाख रु. चा अपहार केल्याचे विविध लेखा परीक्षण व चौकशी अहवालावरून स्पष्ट होते.खेडकर यांनी भ्रष्टाचार करूनही महाविद्यायातर्फे त्याचे वर फोजदारी गुन्हा नोंदिण्यात आला नाही व अपहारातील रक्कम वसुली बाबत त्यांचेवर सिव्हील सुट ही दाखल करण्यात आला नाही.या प्रकरणात विद्याीठाने खेडकर यांना बडतर्फ केले होते. पण पुन्हा त्यांना सेवेत घेऊन त्यांची देयके ही देण्यात आली.हे अत्यंत संशयास्पद व गंभीर असून विद्यापीठ प्रशासन भ्रष्टाचाऱ्यांना का पाठीशी घालत आहे असा प्रश्न निर्माण होतो.
याचबरोबर डॉ.डी एन. बजड हे अनेक घोटाळ्यात दोषी असूनही ते अद्याप दुग्ध तंत्रज्ञान महावद्यालय वरूड पुसद येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.त्याच्यावर त्यांच्या नियुक्ती संदर्भात व त्यांची Phd बनावट असल्याचा संदर्भात मागील १० वर्षा पासून चौकशी चालू आहे व त्याचा अहवाल प्रलंबीत आहे.त्यांची Phd बनावट असल्याचे सिद्ध झाले असून त्यांचे विरूद्ध A.C.B ची चौकशी सुरु आहे व ते सध्या जमानतिवर आहेत.तसेच NAIP प्रकल्प घोाळ्याप्रकरणी त्यांचा सहभाग असून ते त्यात दोषी आहेत.अशा भ्रष्ट विक्तीच्या परीविक्षा कालावधीची स्थगीती उठविण्याबाबतचा ठराव विद्यापीठ समिती कडून होतो हे विद्यापीठातील कार्याबाबत अविश्वास व संभ्रम निर्माण करणारे आहे . डॉ. बाजड यांना निलंबित करण्याऐवजी त्यांना बढती देऊन त्यांना सहयोगी अधिष्ठाता,दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालय वरूड चा अतिरीक्त कारभार सोपविण्याचे तयारीत असल्याचे कळते.तसे शिफारस पत्रही मा.ना.सुनील केदार , पशू संवर्धन व दुग्ध विकास मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी विद्यापीठास दिल्याचे कळते.हा संपूर्ण कारभार संशयास्पद असून भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारे आहे. तेव्हा डॉ. बाजड व प्रा.खेडकर यांना निलंबित करून या प्रकरणाची चौकशी करून फोजदारि गुन्हे दाखल करावेत त्याच्या कडून अपहरातील रक्कम वसूल करण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली.येत्या १५ दिवसात विद्यापीठ प्रशासनाने योग्य निर्णय न घेतल्यास जनहितार्थ महाविद्यालयास तलाठोकुन महाविद्यालया समोरील पुसद – नागपूर महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा ही भाजपा किसान मोर्चा च्या वतीने देण्यात आला.यावेळी आरतीताई फुफाटे, किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष विश्वजित सरनाईक , भाजपचे ज्येष्ठनेते विजयजी पुरोहित,नारायणराव मुडाणकर पाटील,किसान मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस संजय लोंढे ,भाजप महिला आघाडीच्या शहर अध्यक्ष रुपालीताई जैस्वाल,किसान मोर्चाचे तालुका अध्यक्ष ओमप्रकाश शिंदे पाटील ,किसान मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष नारायणराव पुलाते,उत्तर भारतीय आघाडीचे जिल्हा सरचिटणीस संजय पांडे,कामगार आघाडीचे शहर अध्यक्ष बाळासाहेब उखळकर ,ओबसी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण आगाशे ,किसान मोर्चाचे जिल्हा सचिव संजय ठाकरे आदी किसान मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी डॉ.वासनिक, सहयोगी अधष्ठाता यांनी ह्या सर्व प्रकारा बाबत विद्यापीठ प्रशासनाशी चर्चा करणार असल्याचे सांगितले. विद्यापीठ निश्चित योग्य निर्णय घेईल असा विश्वास भाजपा शिष्टमंडळास दिला.