माणुसकीची भिंत मदत केंद्र, येथे गाडगेबाबा जयंती

माणुसकीची भिंत मदत केंद्र, येथे गाडगेबाबा जयंती

राजेश ढोले पुसद प्रतिनिधी

उपजिल्हा रुग्णालय माणुसकी मदत केंद्र पुसद येथे मान्यवरांच्या हस्ते गाडगेबाबा व गजानन महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख पाहुणे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर मीनल भेलोंडे, चित्रकला महाविद्यालय पुसदचे प्राचार्य गजानन मोगरे,शिवप्रभा ट्रस्ट पुणेचे कोषाध्यक्ष परसराम नरवाडे,माध्यमिक शिक्षिका सुरेखा मोगरे यांच्या हस्ते करण्यात आले.

संत गाडगे बाबां यांचा जन्म २३ फेब्रुवारी १८७६ रोजी विदर्भातील शेणगाव या गावी झाला. त्यावेळी समाजात अंधश्रध्देचे थैमान माजले होते.मुक्या प्राण्यांचे बळी दिले जात होते,सावकार गरिबांच्या गळ्यात फास आवळत होते. हे सारे काही संत गाडगेबाबा यांना बघवले नाही आणि अखेर त्यांनी घराचा, संसाराचा त्याग केला.परिश्रमाचे व्रत स्विकारले.डोक्यावर झिंज्या, अंगावर चिंध्या, एका हाती खराटा,फुटक्या मडक्याच्या खापराचे भोजनपात्र असा संत गाडगेबाबांचा वेश होता. ज्या गावात संत गाडगेबाबा जात,ते गाव हातातील खराट्याने स्वच्छ करत व संध्याकाळी गावातील लोकांच्या मनातील घाण कीर्तनाच्या माध्यमातुन स्वच्छ करत.

संत गाडगेबाबा म्हणत अडाणी राहू नका,पोरांना शाळेत पाठवा, सावकाराचे कर्ज काढू नका, मुक्या प्राण्यांचा बळी देऊ नका. भुकेल्यांना अन्न द्या,तहानलेल्याला पाणी द्या, उघड्या नागड्या ना वस्त्र द्या, गरीब मुला मुलींच्या शिक्षणासाठी मदत करा, बेघरना आसरा द्या, त्यांनी आपले पूर्ण जीवन समाजासाठी वाहून दिले, अशा या महान थोर संतांच्या जयंतीनिमित्त माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशन पुसद मदत केंद्र उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्ण त्यांचे नातेवाईक व पुसद मधील बेघर गरजूंना पोळी, भात,भाजी,जिलेबीचे जेवण व नवजात शिशुच्या मातांना फळे वाटप करून गाडगे बाबा यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, यावेळेस मधुकर चव्हाण, दत्तात्रय जाधव, डॉ मीनल भेलोंडे,गजानन मोगरे,सुरेखा मोगरे, दीक्षित पांड्या,मयूर घुस्के,तेजस राठोड,सुरज मोगरे,मोनाली मोगरे,साई मोगरे, माणुसकीच्या भिंतीचे अध्यक्ष गजानन जाधव, उपाध्यक्ष संतोष गावंडे,सचिव जगत रावल,सदस्य संदीप आगलावे,दीपक घाडगे व इतर मान्यवर उपस्थित होते.

Updated : 24 Feb 2022 5:40 AM GMT

Shubham Gote

Mr. Shubham Gote is involved in the day-to-day operations of the company along with the business expansion strategies of the print media division of the group. He also supervises the performance of the company in terms of the business plans. He has been on the Board of the Company since November 2009.

Leave a Reply

Your email address will not be published.