“माझ्यावर काय चांगले दिसते हे मला माहित आहे…’; ट्रोलिंगवर मलायकाने दिले सडेतोड उत्तर

“माझ्यावर काय चांगले दिसते हे मला माहित आहे…’; ट्रोलिंगवर मलायकाने दिले सडेतोड उत्तर

मुंबई – बाॅलीवूड अभिनेत्री ‘मलायका अरोरा’ सोशल मीडियावर सध्या प्रचंड अॅक्टीव असते. त्यावर अनेक फोटो, व्हीडियो  शेअर  करत असते. अनेक चाहते तिचे हे व्हिडिओ पाहण्यासाठी आतूर असतात. मलायका अशी अभिनेत्री आहे जिने जणू आपल्या वाढत्या वयाला एखाद्या जादूच्या डब्बीत कैद केलंय आणि तारुण्याचं वरदान मिळवलं आहे. मलायका तिच्या स्टाईलसाठी प्रसिद्ध आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

तिच्या ड्रेसिंग सेन्स अनेक चाहत्यांना आवडतो. मालयकाच्या हॉट आणि सेक्सी लूक पुढे आजच्या भल्या भल्या अभिनेत्री तिच्या समोर फिक्या वाटतात. म्हणूनच आताच्या मुलींसारखा छोटासा क्रॉप टॉप आणि स्टाइलिश जिन्स घालून ग्लोइंग स्किन फ्लॉन्ट करताना मलायका आपल्या दिसते. मालयकाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

फॅन्स सुद्धा तिच्या मादक अदांवर फिदा होत असतात. तर कधी-कधी तिला ट्रोल सुद्धा करतात. मात्र, नुकतंच अश्या ट्रोलरला मालयकाने सडेतोड उत्तर दिले आहे. “एखादी ड्रेसिंग करणे ही माझी वैयक्तिक निवड असून, माझ्यावर काय चांगले दिसते हे मला माहित आहे.’ असं तिने म्हंटलं आहे. एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेच्या मुलाखती दरम्यान अभिनेत्री मलायका अरोराने आपलं मत व्यक्त केलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

या मुलाखतीत तिला ड्रेसिंगवरुन होणाऱ्या ट्रोलिंगबद्दल विचारण्यात आले. यावर मलायका म्हणते की…, “महिलांच्या नेकलाइन आणि हेमलाइन्सवर नेहमीच टीका केली जाते. एखादी ड्रेसिंग करणे ही माझी वैयक्तिक निवड आहे. मी काय परिधान करावे हे इतरांनी सांगण्यापेक्षा लोकांनी त्यांचे स्वतःचे जीवन जगावे आणि इतरांनाही जगू द्यावे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

“मी मूर्ख नाही. माझ्यावर काय चांगले दिसते हे मला माहित आहे. जर मी काहीही परिधान करत असेल आणि मला त्यात आरामदायी वाटत असेल तर इतरांनाही ते स्वीकारले पाहिजे. एखाद्या स्त्रीला नेहमी तिच्या स्कर्टची लांबी किंवा तिच्या नेकलाइनवरुन बोलले जाते. लोक माझ्या हेमलाइन किंवा नेकलाइनबद्दल काय बोलतात, त्यानुसार मी माझे आयुष्य जगू शकत नाही..” असं मलायका म्हणाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

दरम्यान, गेल्या दोन दिवसांपूर्वी अश्याच एका ड्रेसिंगवरुन मलायका सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं होत. मलायका नेहमीप्रमाणे सकाळी तिच्या पाळीव श्वानाला कॅस्परला घेऊन फिरायला गेली. त्यावेळी तिथे असलेल्या छायाचित्रकारांनी तिचे फोटो काढले. यावेळी मलायकाने करड्या रंगाची ट्रॅक पँट आणि त्याच रंगाचं स्वेटशर्ट घातलं होतं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

तसेच तिने सुरक्षेसाठी दोन मास्कही घातले होते. करड्या रंगाच्या या ट्रॅक सूटमध्ये मलायका खूपच सुंदर दिसत होती. परंतू या ड्रेसमध्ये मलायकाने अंतर्वस्त्र घातले नव्हते. त्यावरून युझर्सनी तिला ट्रोल केलं असून, काही युझर्सनी तिच्या या फोटोवर अतिशय वाईट कमेन्ट केल्या होत्या.


Shubham Gote

Mr. Shubham Gote is involved in the day-to-day operations of the company along with the business expansion strategies of the print media division of the group. He also supervises the performance of the company in terms of the business plans. He has been on the Board of the Company since November 2009.

Leave a Reply

Your email address will not be published.