माजी आमदार वामनराव कासावार यांच्या वाढदिवशी अनेक पक्षातील शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश.

वणी:— माजी आमदार वामनराव कासावार तथा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन व पक्ष प्रवेश सोहळा २४ जानेवारी रोजी दुपारी एक वाजता वसंत जिनिंग लॉन येथे आयोजित केला आहे. यावेळी सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी खासदार बाळूभाऊ धानोरकर उपस्थित राहणार आहेत. विशेष अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्य उर्जामंत्री डॉ.नितीन राऊत,जमिन विकास व भुकंप पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार तसेच प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री माणीकराव ठाकरे, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, माजी मंत्री वसंतराव पुरके, महाराष्ट्र प्रदेश महिला कॉंग्रेस कमिटी अध्यक्षा संध्याताई सव्वालाखे, आमदार डॉ.वजाहत मिर्झा, यांचे उपस्थितीत विधानसभा क्षेत्रातील विविध पक्षांतील पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते कॉंग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत.
Updated : 23 Jan 2022 7:00 PM GMT