मांडवा, गट ग्रामपंचायत, अंतर्गत, (बोरनगर तांडा) येथे अंगणवाडी बांधकामाचे भुमीपुजन!

राजेश ढोले/पुसद प्रतिनिधी
पुसद तालुक्यातील मांडवा व बजरंगनगर तांडा गट ग्रामपंचायत असलेल्या बजरंग नगर तांडा येथे नुकतेच यवतमाळ जिल्हा परिषदेचे सदस्य भोलानाथ कांबळे यांच्या फंडातून महिला व बालकल्याण या योजनेतुन साडेआठ लाख रुपयाचा निधी, मंजूर झाल्याने अंगणवाडी इमारतीच्या बांधकामाचे भुमीपुजन करण्यात आले.
सध्या देशामध्ये कोरोणा डेल्टा, नव्यानेच आलेला ओमायक्रोन vereyent या विषाणूने थैमान घातले आहे. या विषाणूचा ज्येष्ठ नागरिक व बालकांमध्ये, आजाराचा प्रादुर्भाव सर्वाधिक असल्याने नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही परिस्थिती लक्षात घेता ग्रामपंचायतच्या वतीने या इमारतीच्या बांधकाम भुमीपुजनाचा कार्यक्रम पार पडला.
मांडवा येथील प्रतिष्टीत नागरिक रमेश ढोले यांच्या हस्ते भुमीपुजन करण्यात आले.
यावेळी सचिव एस.टी.तडसे, उपसरपंच विजय राठोड, तंटामुक्ती समिती अध्यक्ष सुधाकर चव्हाण, ग्राम पंचायत सदस्य गोपाल मंदाडे, कैलास राठोड, हरिभाऊ धाड, प्रविण आडे, संदिप जाधव, विठ्ठल आडे, दिलीप जाधव , माणिक आडे, देविदास गजभार, गजानन आबाळे, बाळु पुलाते, ग्रामपंचायत कर्मचारी प्रदुम्न आबाळे,तसेच इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.