महीला सुरक्षा आणि सक्षमीकरण हिच आमची प्राथमिकता-पोलीस अधीक्षक वाशिम

(फुलचंद भगत)
वाशिम:-दिनांक 07/03/2022 रोजी 16.00 वा जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन मा. पोलीस अधिक्षक वाशिम यांचे मार्गदर्शनात महिला सक्षमीकरण, महिला सुरक्षा व अन्य संबंधित विषयांवर चर्चा करणे करीता जिल्हास्तरीय महिला सुरक्षा समिती ची मिटींग आयोजित करण्यात आली. सदर मिटींग करीता जिल्हयातील विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांना निमंत्रित करण्यात आले होते.त्यामध्ये जिल्हयातील लॉयन्स क्लब, जेसीआय क्लब, इनरव्हिल क्लब च्या सदस्या, कृषी सखी, पशु सखी अभियान, यशश्विनी सामाजिक अभियान इत्यादी अभियान अंतर्गत शेतकरी महिलांना मार्गदर्शन करणाऱ्या महिला, ध्यास बहुददेशिय संस्थेच्या माध्यमातुन महीलांसाठी कार्य करणाऱ्या महिला, कौंटुबिक हिंसाचाराच्या प्रकरणात समुपदेशन करुन मोलाची कामगिरी पार पाडणाऱ्या महिला, डॉक्टर, वकिल इत्यादी विविध क्षेत्रातील एकुण 40 महिला उपस्थित होत्या.मा. पोलीस अधीक्षक यांनी महिलांना मार्गदर्शन करतांना सांगितले की महिलांवर झालेल्या अत्याचाराबाबत महिला तक्रार स्पष्टपणे मांडण्यास पुढे येत नाहीत अशा वेळी महिलांच्या संदर्भात त्यांच्यावर होणा-या शारिरीक, मानसिक आणि घरगुती हिंसाचाराच्या संदर्भात महिला दक्षता समिती पोलीस स्टेशन स्तरावर अशा पिडीत महिलांना न्याय मिळवून देण्यास मदत करते. त्यावेळी पोलीस अधीक्षक यांनी पी पी टी दवारे सादरीकरण केले. ज्यामध्ये पोलीस दलातर्फे राबविण्यात येणारे विविध उपक्रम जसे की डायल 112, दृष्टी प्रणाली, अवैध धंदयांवर केलेल्या कारवाई, ग्रामभेट उपक्रम, पोलीस काका, पोलीस दिदी, सायबर सेफ वुमेन बाबत माहिती, महीला विषयक दाखल गुन्हे, दोषसिदधी बाबत माहीती, पदोन्नती कार्यक्रम इत्यादी बाबत माहीत निर्भया पथकाचे कार्य, महिला तक्रार निवारण कक्ष इत्यादी विषयी मार्गदर्शन केले. वाशिम पोलीस दलातील विविध शाखेविषयी जनतेला माहिती व्हावी या करीता तयार केलेले फ्लायर महिलांना सादर करण्यात आले आहेत. भादवि कलम 376, कलम 354 तसेच पोस्को कायदयाअन्वये दाखल गुन्हे इत्यादी महीला अत्याचाराचे गुन्हे ऊघडकीस आणण्याचे प्रमाण 100 टक्के असुन जास्तीत जास्त दोषसिदधी होणे करीता आम्ही प्रयत्नशिल आहोत असे मा.पोलीस अधीक्षक यांनी सांगितले.
महीला पोउपनि अश्विनी धोंडगे यांनी निर्भया पथक बाबत सर्व महिलांना माहिती दिली तसेच महीला पोउपनि स्वाती इथापे यांनी महीला तक्रार निवारण कक्ष आणि भरोसा सेल बाबत माहीती सादर केली.पुढे बोलतांना मा.पोलीस अधीक्षक यांनी सांगितले की जर एखादी महिला संकटात असेल तर तिची मदत करणे ही आपले सामाजिक जबाबदारी आहे. महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी पोलीस दल नेहमी सज्ज आहे. अदयापपर्यंत डायल 112 या प्रणाली अंतर्गत संकटात मदत करणाऱ्या महिलांची आम्ही तत्काळ मदत करुन त्यांच्या समस्यांचे निवारण आहे. बैठक दरम्यान सामाजिक क्षेत्रात कार्य करतांना महीलांना निर्माण होणाऱ्या अडचणी जाणुन घेतल्या.महीलांना अत्यावश्यक परीस्थितीत संपर्क करण्यासाठी पोलीस अधीक्षक यांनी त्यांचा मोबाईल नंबर तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयाचा संपर्क क्रमांक महिलांना दिला.
प्रतिनिधी:-फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम
मो.8459273206