‘मविआ’मधील दोन मंत्र्यांच्या बायकाही माझ्याप्रमाणेच त्रस्त; करुणा मुंडेंचा गौप्यस्फोट

‘मविआ’मधील दोन मंत्र्यांच्या बायकाही माझ्याप्रमाणेच त्रस्त; करुणा मुंडेंचा गौप्यस्फोट

मुंबई – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे संपूर्ण महाराष्ट्राला आता परिचीत झाल्या आहेत. सुरुवातीला त्यांनी थेट धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध निवडणूक लढविण्याची घोषणा केली होता. त्यानंतर त्यांनी पक्ष स्थापन करण्याचा निर्णय़ घेतला. आता त्यांनी खळबळजनक दावा केला आहे.

राज्यातील महाविकास आघाडी  सरकारमधील दोन मंत्र्यांच्या बायकाही माझ्याप्रमाणेच त्रस्त आहेत. त्यामुळे त्याही लवकरच आपल्यासोबत येणार आहेत, असं करुणा मुंडे यांनी सांगितले. मात्र मंत्र्यांची नावे सांगण्यास त्यांनी नकार दिला. संबंधित नेत्यांमधील एक राष्ट्रवादीचा तर दुसरा शिवसेनेचा मंत्री असल्याचं त्या म्हणाल्या.

करुणा मुंडे नव्या पक्षाची स्थापना करणार असून त्यांच्या पक्षाचं नाव “शिवशक्ती सेना” ठरलं आहे. नगरमध्येच येत्या ३० जानेवारी रोजी पक्षाची स्थापना करण्याचा करुणा मुंडे यांनी निश्चित केलं होतं. मात्र करोनामुळे आता पक्ष स्थापना लांबणीवर पडली आहे.

यावेळी करुणा मुंडे म्हणाल्या की, माझ्यावर जी परिस्थिती आली, तशीच अनेक मंत्र्यांच्या कुटुंबात आहे. राज्यातील विद्यमान दोन बायका आपल्या संपर्कात आहेत. त्याची नावं उघड करणार नाही. पण पक्ष स्थापनेच्या वेळी त्या आमच्या पक्षात सामील होती, असंही करुणा मुंडे यांनी नमूद केलं.

Shubham Gote

Mr. Shubham Gote is involved in the day-to-day operations of the company along with the business expansion strategies of the print media division of the group. He also supervises the performance of the company in terms of the business plans. He has been on the Board of the Company since November 2009.

Leave a Reply

Your email address will not be published.