मराठी भाषा दिनानिमित्ताने प्रा.सलमान सरांच्या मराठी भाषा अकॅडमी पुसद तर्फे विविध कार्यक्रमाचे अयोजन

मराठी भाषा दिनानिमित्ताने प्रा.सलमान सरांच्या मराठी भाषा अकॅडमी पुसद तर्फे विविध कार्यक्रमाचे अयोजन

7 फेब्रुवारी मराठी भाषा दिनानिमित्ताने प्रा.सलमान सरांच्या मराठी भाषा अकॅडमी पुसद तर्फे विविध कार्यक्रमाचे अयोजन

पुसद : 27 फेब्रुवारी रोजी प्रा.सय्यद सलमान सरांच्या मराठी भाषा अकॅडमी तर्फे मराठी भाषा दिवसांच्या निमित्ताने मराठी भाषेचे महत्व या विषयावर वक्तृत्व स्पर्धा व मराठी भाषेच अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी महत्व अश्या दोन प्रकारचे कार्यक्रमाचे सत्र ठेवण्यात आले होते .प्रथम सकाळ सत्र मध्ये प्रा.सय्यद सलमान सरांनी मराठी भाषेत तयार केलेले विद्यार्थ्यांची वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.कार्यक्रम अयोजित करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष :इर्शाद अली नवाब साहेब होते तर प्रमुख पाहुणे: मो.अकील सर होते तर स्पर्धेचे परीक्षक म्हणून नईम सर, परवेज जनाब होते या मध्ये एकूण 12 विद्यार्थ्यांना सहभाग नोंदविला होता.विद्यार्थ्यांना खूप छान प्रकारे मराठी भाषेत मराठी भाषेचे महत्व आपल्या भाषणात सांगितले या मध्यें 12विद्यार्थ्यांन विद्यार्थ्यांनी सहभाग अश्मीरा फलक,तहुरा इर्शाद अली नवाब,हुदा तहेरीम ,जुहा फतेमा, युशरा माहीन,उम्मे कुलसूम , सानिया परवीन , आफिया गोहर , तर जसीम ,तलहा या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला त्यातील 9 विद्यार्थ्यांना सहभाग बक्षीस देण्यात आले तसेच 3 विध्यार्थ्यांना(जसीम,तहुरा नवाब,अफशा फिरदोस ,जुहा फतेमा या विद्यार्थ्यांना प्रथम,द्वितीय, तृतीय पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. विशेष म्हणजे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी वर्ग आठवीच्या अमिनूस्वालेहा व अक्सा गोहर या विद्यार्थीने मराठी भाषेतच केले तसेच मराठी भाषेच सोबतच शारीरिक शिक्षण या वर मो.अकील सरांनी आपले मत व्यक्त केले तर इर्शाद अली नवाब ठेकेदार यांनी मुलांना सुद्धा अश्या कृती मध्ये जास्त प्रमाणात सहभास करण्यासाठी अहवान केले अश्या प्रकारे सकाळ सत्रा मध्ये प्रा.सय्यद सलमान सरांच्या मराठी भाषा अकॅडमी मध्यें मराठी वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आले होते. या नन्तर दुपार सत्र ज्या मध्ये मराठी भाषेची अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी आवश्यकता या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते .या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.मातोंडक सर API वसंतनगर पुसद,प्रमुख पाहुणे: नईम सर, कय्युम भाई होते तर प्रमुख मार्गदर्शक मा.डॉ.प्रल्हाद वावरे सर (मराठी विभाग प्रमुख फुलसिंग नाईक महाविद्याल पुसद) होते तर आयोजका मध्ये प्रा.सलमान सर आणि सोबत अफजल भाई (फुटबॉल खेळाडू) असिफ सर होते. या कार्यक्रमात मध्ये प्रा.सय्यद सलमान सरांनी प्रस्तावना केली तर मा.डॉ.प्रल्हाद वावरे सरांनी अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना मराठी भाषेच महत्व यावर खूपच महत्वाचे भाषण दिले सोबतच डॉ.प्रल्हाद वावरे सरांचा सत्कार कय्युम भाई सामाजिक कार्यकर्ते यांच्या हस्ते करण्यात आला तसेच वावरे सरांनी प्रा.सलमान सय्यद सरांच्या अल्पसंख्याक समाजामध्ये मराठी भाषेच आणि स्पर्धा परीक्षेच्या कार्याची स्तुती केली. या नन्तर मा.कय्युम भाई ने आपल्या भाषणात अल्पसंख्याक मुलांना मराठी शिकावं या वर आपले मत व्यक्त केले तर नईम सरांनी मराठी भाषेतून शिक्षण घेतल्या नंतर भविष्यातील होणारे लाभ सांगितले तसेच योग्य मार्गदर्शन वेळेवर मिळाल्यास विद्यार्थी घडतो हे नमूद केले व अध्यक्षीय भाषणात मा.मातोंडकर साहेबांनी यु,पि,एस ,सी/एम ,पि एस मध्ये मराठी भाषेच महत्व यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच प्रा.सय्यद सलमान सरांच्या मराठी भाषा अकॅडमीच उद्घाटन सुद्धा करण्यात आले आणि प्रा.सय्यद सलमान सरांच्या अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी शिक्षणासाठी करण्यात येणाऱ्या कार्याचे कौतुक करण्यात आले.आणि अश्या प्रकारच्या उपक्रमासाठी भविष्यात सहकार्य करण्याची शाश्वती दिली आणि या कार्यक्रमासाठी शुभेच्छा सुद्धा दिल्या, अश्या प्रकारे महाराष्ट्रात एक आगळा वेगळा कार्यक्रम मराठी भाषा दिनानिमित्ताने पुसद येथे प्रा.सय्यद सलमान सरांनी मराठी भाषा अकॅडमी च्या अंतर्गत एक अल्पसंख्याक वर्गात मराठी भाषेच्या जनजागृती करिता मराठी भाषा दिन आयोजित करून समाजापुढे नवीन आदर्श निर्माण केले आणि म्हणून मराठी भाषेच्या कार्यासाठी सरांचे सर्वी कडून कौतूक होत आहे.

Updated : 2 March 2022 7:19 AM GMT

Shubham Gote

Mr. Shubham Gote is involved in the day-to-day operations of the company along with the business expansion strategies of the print media division of the group. He also supervises the performance of the company in terms of the business plans. He has been on the Board of the Company since November 2009.

Leave a Reply

Your email address will not be published.