मंगरूळपीर येथे जवाहर नवोदय विद्यालय सराव परिक्षेचे आयोजन

फुलचंद भगत
वाशिम:-दिनांक ०३/०४/२०२२रोजी जिल्हा परिषद हायस्कूल मंगरूळपीर येथे विद्यार्थी हितकारीणी मित्रमंडळ आणि श्री सुभाष पवने (ग.शि. अ. मं पीर),श्री श्रीकांत माने (ग.शि. अ. कारंजा),श्री बी. एस.मनवर (माजी महाव्यवस्थापक महात्मा फुले विकास महामंडळ)यांच्या मार्गदर्शनाखाली नवोदय विद्यालय सराव परिक्षेचे आयोजन करण्यात आले होते.
वाशिम जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना नवोदय विद्यालय प्रवेश परिक्षेची पुर्वतयारी व्हावी या उद्देशाने दरवर्षी जिल्हा परिषद हायस्कूल मंगरूळपीर येथे पुर्वतयारी परिक्षेचे आयोजन करण्यात येते.यावर्षी या परिक्षेसाठी वाशिम जिल्ह्यातील ३००विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.ही परिक्षा नवोदय विद्यालय परिक्षेच्या धर्तीवरच घेतली जाते, जिल्हा परिषद,नगर परिषद येथील तज्ञ शिक्षक मंडळी यांचे मार्गदर्शनात पेपर सेट काढुन खेळीमेळीच्या वातावरणात परिक्षा घेतली जाते, यामुळे विद्यार्थी कसल्याही दडपणाखाली न राहता पेपर सोडवतात.याचा फायदा विद्यार्थ्यांना येणाऱ्या नवोदय विद्यालय प्रवेश परिक्षेकरिता होत असल्याची माहिती मुख्य आयोजक अंकुश सुरवसे यांनी दिली.या परिक्षेच्या यशस्वीतेसाठी गजानन निचळ, गजानन होलगरे, संतोष राठोड,विष्णु गावंडे, संतोष इंगळे,दिपक जायभाये, मंगेश गिरी, इंगोले मॅडम,वैजनाथ दहिफळे,राम पांढरे, श्रीकांत इंगोले,बालाजी मोटे,अनिल जाधव,भाष्कर नागरगोजे,अमोल घळे,अमर शिंदे,चंद्रमणी इंगोले,हरीहर राऊत, निलेश म्हतारमारे,रवि ठाकरे, मुकेश म्हतारमारे,स्नेहदिप गोरे,युवराज अव्हाळे, जितेश जगताप निलेश मोरे ,माधव करडखेले, महादेव सोनटक्के,अनिल खाडे, संतोष बळी सर यांनी सहकार्य केले.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206