मंगरुळपीर येथील मोटारसायकल चोरणारे तिघे पोलिसांच्या जाळ्यात;१६ मोटारसायकल जप्त

मंगरुळपीर येथील मोटारसायकल चोरणारे तिघे पोलिसांच्या जाळ्यात;१६ मोटारसायकल जप्त

वाशिम:-पोलीस स्टेशन मंगरुळपीर येथे मागील वर्षापासुन शहरात व ग्रामीण भागात दिवसान दिवस मोटर सायकल चोरीच्या घटना घडत होत्या त्याकरीता पोलीस विभागाला सदर चोरीचा छडा लावण्याचे आव्हाण चोरांनी दिले होते.त्याकरीता पोलीस स्टेशन मंगरुळपीर तपास पथकाने आपली उर्जा पनाला लावुन सदर चोरीचा छडा लावला.व तीन आरोपीना अटक करुन १६ मोटर सायकल जप्त करण्यात आल्या.

दि.२६/१२/२१ रोजी पोलीस स्टेशन मंगरुळपीर शहरातील क्रीडा सर्कुल येथिल बजाज डीस्कव्हर मोटर सायकल सकाळी ६/00 वाजता कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरुन नेली अशा फी चे रीपोर्ट वरुन पो. स्टे ला अप.नं ११७६/२१ कलम ३७९ भा.द.वि प्रमाणे गुन्हा दाखल झाला सदर गुन्हाचा तपास करतांनी दि. २४/०१/२१ रोजी पोलीस स्टेशनचे तपास पथकाला गुप्त माहीतीगार मार्फत माहीती मिळाली की एक इसम मो.सायकलची कोणतीही कागदपत्र नसतांनी विक्री करीत आहे.अशा खबरवरुन सदर पो.स्टे तपास पथकाने वेळेचाही विलंब न करता घटनास्थळी खाना झाले व तेथे एका इसमाला पकडले त्याला त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव भिवा उर्फ चंद्रशेखर जिनवर वानखडे असे सांगीतले.त्याला ताब्यात घेवुन तपास पथकाने त्यांचा हीसका दाखवला असता.सदर आरोपी याने सदर मो.सा पेडगाव येथे एक विधीसघर्ष बालक यांचेकडे ठेवल्याचे सांगीतले.सदर ठीकाणी जावुन विधीसघर्ष याचे ताब्यातुन चोरी गेलेली मो.सा हस्तगत केली.वरील दोन्ही इसमास पोलीस स्टेशनला आनले व कसुन विचारपुस केली असता भिवा व विधीसघर्ष बालकयांनी सांगीतले की आम्ही सन २०२० पासुन मंगरुळपीर व आजुबाजुचे परीसरातील व इतर जिल्हातील मो.सा चोरी करीत आहो आणी आमचे सोबत सुरज ज्ञानदेव पाटील व धम्मा राजेद्रं वानखडे दोन्ही रा.मंगळसा त्यापेकी सुरज हा आमचा मुखीया असुन चोरीची मोटर सायकल सुरज पाटील कडे देवुन तो सदर मोटर सायकल विनाकागदपत्र विकत होता. तपास पथकाने ग्राम मंगळसा जावुन धम्मा वानखडे याला ताब्यात घेतले पंरतु सुरज पाटील याला त्यांचे साथीदार पोलीसांनी ताब्यात घेतल्याची भनक लागल्याने तो फरार झाला.सदर ताब्यात घेतलेल्या इसमांची कसून चौकशी केली असता त्यांनी ग्राम शिवणी येथिल शेतलगत असलेली मोटर सायकल व ग्राम बेलखेड येथिल मोटर सायकल अशा प्रकारे एकुण १६ मोटर सायकल चोरी केल्याचे सांगीतले वरुन सदर मोटर सायकल त्या इसमांना विकली त्यांचेकडुन जप्त करुन इतर ३ मो. सा ग्राम मंगळसा येथिल आरोपी सुरज पाटील यांचे घरुन जप्त केल्या. सदर आरोपीनां वरील गुन्हात अटक करुन त्यांचेवर कलम ३७९ भा.द.वि प्रमाणे अटक करण्यात आली. सदर गुन्हातील जप्त मोटर सायकल चे इजीन नंबर व चेचीस नंबर ची यादी बनवुन इतर पो.स्टेशन व जिल्हा बाहेरील पोलीस स्टेशन यांना माहीती देण्यात आली.पुढील तपास सा.पो.नि निलेश शेबंडे करीत आहे. मोसा कि-दाजे 3200204 आतापावेतो उघड करण्यात आलेल्या मोटर सायकल चोरीच्या गुन्हातील पो.स्टे मंगरुळपीर येथिल खलील नमुद गुन्हातील मोटर सायकल अटक करण्यात आलेल्या गुन्हेगाराकडुन मिळुन आल्या आहेत उरवरीत मोटर सायकल कोफ्त्या गुन्हातील व कोणत्या पोलीस स्टेशन मधिल आहेत नक्की कोठुन चोरल्या आहेत.त्यामध्ये काही बदल केले आहे का,तसेच या शिवाय आनखी मोटर सायकल त्यांनी चोरुन कोठे विकल्या आहेत का याबाबत तपास करीत आहोत.

१:-अप नं ११७६/२१ कलम ३७९भा.द.वि

२:-अप.नं १२२१/२० कलम ३७९ भा.द.वि

३:-अप नं १२२८/२० कलम ३७९भा.द.वि

सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक श्री.बच्चन सिंह,अप्पर पोलीस अधिक्षक श्री.गोरख भामरे,उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत केडगे, पोलीस निरीक्षक धंनजय जगदाळे यांचे मार्गदर्शनाखाली सा.पो.नि निलेश शंबडे डी.बी पथकाचे पो.हे.कॉ अमोल मुंदे पो.कॉ मोहम्मद परसुवाले.

सचिन शिंदे,मिलीदं भगत ,जितेद्र ठाकरे यांनी केली.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम

मो.8459273206

Updated : 24 Jan 2022 8:23 PM GMT

Shubham Gote

Mr. Shubham Gote is involved in the day-to-day operations of the company along with the business expansion strategies of the print media division of the group. He also supervises the performance of the company in terms of the business plans. He has been on the Board of the Company since November 2009.

Leave a Reply

Your email address will not be published.