भीम आर्मी जिल्हाध्यक्ष अशोक भालेराव धम्मभुषण पुरस्काराने सन्मानित.!

भीम आर्मी जिल्हाध्यक्ष अशोक भालेराव धम्मभुषण पुरस्काराने सन्मानित.!

भीम आर्मी जिल्हाध्यक्ष अशोक भालेराव धम्मभुषण पुरस्काराने सन्मानित.!

बाबासाहेबांचे पणतू मा.राजरत्नजी आंबेडकर यांच्या हस्ते सपत्नीक सन्मानित.!

पुसद- विश्वालाशांतिदुत तथागत गौतम बुद्ध,संत कबीर,महात्मा ज्योतिबा फुले,छत्रपती शाहू महाराज,छत्रपती शिवाजी महाराज डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची बहुजनवादी विचारधारा घरोघरी पोहचवणारे तसेच भीम आर्मी भारत एकता मिशन च्या माध्यमातून समाजाला न्याय देण्यासाठी संघर्ष करणारे विचारधारा घरोघरी पोहचवणारे भीम आर्मी भारत एकता मिशन जिल्हाध्यक्ष यवतमाळ जिल्हा अशोक भालेराव व यांच्या पत्नी वैशाली भालेराव यांना

धम्मक्रांती प्रज्ञापर्व २०२२ च्या उद्घाटन प्रसंगी आलेले डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज तथा भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय अध्यक्ष, मा.राजरत्नजी आंबेडकर साहेब यांच्या हस्ते पुसद येथे धम्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.अशोक भालेराव हे भीम आर्मी च्या माध्यमातून समाजातील अन्याय अत्याचाराविरुद्ध न. भीम आर्मी च्या माध्यमातून त्यांनी समाजातील अन्यायग्रस्त पीडितांना न्याय भीम नेहमी आर्मी च्या माध्यमातून आवाज उठवीत असतात ते अनेक वर्षांपासून समाजावरील अण्याया विरोधात भीम आर्मी च्या माध्यमातून कित्येक षडयंत्र हाणून पाडले त्यांच्या सर्व कामाची दखल घेऊन अशोक भालेराव यांना धम्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.अशोक भालेराव यांना धम्मभूषण पुरस्कारा बद्दल विचारले असता त्यांनी या पुरस्काराने आणखी प्रेरणा मिळाली आणि या पुढे ताकतीने संघर्ष करण्यास मला ऊर्जा मिळाली आहे,आणि माझ्या शरीरात ऊर्जा असे पर्येंत आंबेडकरी विचारधारा व समाजातील अन्याय अत्याचाविरुद्ध अजून ताकतीने पेटून उठेन.व समाजाला भीम आर्मी च्या माध्यमातून न्याय देण्याचा निस्वार्थ प्रयत्न करेन.धम्मभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल, भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय राजरत्न आंबेडकर साहेब यांचे विशेष आभार व्यक्त केले तसेच अशोक भालेराव यांचे विविध सामाजिक संघटना व,मित्र परिवार यांच्याकडून अभिनंदन कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Updated : 9 April 2022 2:15 PM GMT

Shubham Gote

Mr. Shubham Gote is involved in the day-to-day operations of the company along with the business expansion strategies of the print media division of the group. He also supervises the performance of the company in terms of the business plans. He has been on the Board of the Company since November 2009.

Leave a Reply

Your email address will not be published.