भारतीय जनता पार्टी यवतमाळ शहर तर्फे मंत्री नवाब मलिकच्या राजीनाम्यासाठी भाजपाची तीव्र निदर्शने

भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांच्या सूचनेप्रमाणे जिल्हा नेते आमदार मदनभाऊ येरावार व भाजपा जिल्हाध्यक्ष नितीनभाऊ भुतडा यांच्या मार्गदर्शनात भाजपा यवतमाळ शहर अध्यक्ष प्रशांत यादव पाटील यांच्या नेतृत्वात आज दुपारी बारा वाजता स्थानिक दत्त चौक येथे मंत्री नवाब मलिक यांचा ताबडतोब राजीनामा घेण्यात यावा या मागणीसाठी तीव्र निदर्शने करण्यात आली. मंत्री नवाब मलिक यांनी 1993च्या मुंबई बॉम्बस्फोटातील गुन्हेगारांकडून कुर्ल्यात जमीन खरेदी केली व दाऊद गँगचा बेनामी पैसा मालमत्तेत वळविल्याच्या आरोपावरून ईडी ने त्यांची चौकशी करून काल अटक केली. त्यामुळे त्यांना मंत्रिपदावर राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार उरलेला नाही. त्यांचा त्वरित राजीनामा घ्यावा अशी मागणी भारतीय जनता पार्टीने यावेळी केली.
या आंदोलनात जिल्हा महामंत्री राजू पडगिलवार, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष मायाताई शेरे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आकाश धुरट, भाजपाचे ज्येष्ठ नेते मनोजभाऊ इंगोले, बाळासाहेब शिंदे, अजय खोंड, शंतनु शेटे, ज्ञानेश्वर सुरजूसे, अजय बिहाडे, सुनील समदूरकर, देवा राऊत,संजय खडसे, प्रशांत देशमुख, उषा खटी, भारती जाठे, अश्विन बोपचे, शुभम चोरमले, विशाल बावणे, भावीन पतीरा, सुरज विश्वकर्मा, अभिषेक श्रीवास, अश्विन तिवारी सर्वेश नावाडे, उमेश राठोड अतुल शिखरे रेखा नंदूरकर, नंदा जीरापुरे, नितीन गिरी, मोहन देशमुख, मोहन जाधव, जयदीप सानप, मुन्ना मिश्रा, अमोल खंडार, उमेश राठोड, रवी कडवं,मनोज मुधोळकर यांचेसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.