भाजपा प्रदेश कार्यकारिणीवर निमंत्रित सदस्य म्हणून बालाजी बच्चेवार यांची वर्णी

नायगाव ता प्रतिनीधी :- सय्यद अजिम नरसीकर
नायगाव विधानसभा क्षेत्रातील संघर्षशाली नेतृत्वश्री बालाजी बच्चेवार यांची महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीच्या कार्यकारणीवर निमंत्रित सदस्य म्हणून वर्णी लागली आहे.
भाजपा प्रदेशाध्यक्ष मा आमदार चंद्रकांत दादा पाटील यांनी बच्चेवार यांची प्रदेश कार्यकारिणीत निवड केल्याचे लेखी पत्र दिले आहे सदर नियुक्ती पत्र नांदेड जिल्हा भाजपा खासदार श्री प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते श्री बच्चेवार यांचा गौरव करून नियुक्तीपत्र देण्यात आले यावेळी खा चिखलीकर जिल्हाध्यक्ष श्री गोजेगावकर महानगर भाजपाध्यक्ष श्री प्रविण मसाले सरचिटणीस गंगाधर जोशी भाजपाचे चैतन्य बापू देशमुख मिलिंद देशमुख यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या.
बालाजी बच्चेवार हे नायगाव विधानसभा क्षेत्रात एक संघर्ष शाली, लढावे नेतृत्व म्हणून जनाधार असलेले जुनेजाणते नेते आहेत.
भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीवर श्री बच्चेवार यांची वर्णी लागल्यामुळे नायगाव, नरसी ,धर्माबाद ,उमरी आदी भागात कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले .कोणत्याही पदाची अपेक्षा न करता आजपर्यंत संघर्षमयरित्या भारतीय जनता पार्टीचे नेटाने कार्य करणारे बच्चेवार हे जुनेजाणते नेते आहेत निमंत्रित सदस्य म्हणून प्रदेश कार्यकारिणीवर नियुक्ती केल्यामुळे प्रदेशाध्यक्ष मा आमदार चंद्रकांत दादा पाटील आणि भाजपा खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचेही कार्यकर्त्यांच्या वतीने अभिनंदन केले जात आहे.