भाजपा कार्यकर्त्यांनी केला वचनपूर्तीचा जल्लोष बाबूपेठ प्रभागासाठी 16 कोटी 84 लक्षचा निधी आ.सुधीर मुनगंटीवारांनी पाळला शब्द


बाबुपेठ प्रभागातील जनतेला दिलेल्या वचनाची पुर्तता करण्यासाठी विधिमंडळ लोक लेखा समिती अध्यक्ष आ.सुधीर मुनगंटीवार यांनी 16कोटी 84 लक्ष रुपयांचा निधी नुकताच उपलब्ध करून दिला.या विषयाची महानगरात जोरदार चर्चा सुरू आहे.आ मुनगंटीवार यांनी दिलेला शब्द पाळल्याने परिसरातील भाजपा कार्यकर्ते व नागरिकांनी नेताजी सुभाषचंद्र बोस चौक बाबूपेठ येथे गुरुवार(3मार्च)ला जल्लोष करीत आ मुनगंटीवार यांचे कौतुक केले आहे.या निधीतून आता बाबूपेठ प्रभागातील दीर्घकाळापासून प्रलंबित असलेले रस्ते व नालींचे काम पूर्ण केले जाणार आहे.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे,महानगर जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे,महापौर राखी कंचर्लावार, उपमहापौर, राहुल पावडे,स्थायी समिती सभापती संदीप आवारी,भाजपा नेते प्रमोद कडू,राजेंद्र गांधी,प्रकाश धारणे,ब्रिजभूषण पाझारे,रवी गुरनुले,दिनकर सोमलकर,सुरेश तालेवार,चंद्रशेखर गंनुवार,नगरसेवक प्रदीप किरमे,ज्योती गेडाम, कल्पना बागूलकर, शाम कनकम, संदीप आगलावे,जयश्री जुमडे,देवानंद वाढई,राजेंद्र खांडेकर,प्रज्वलंत कडू,प्रमोद क्षीरसागर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी देवराव भोंगळे म्हणाले,बाबुपेठ प्रभागात वैष्णवी आंबटकर या युवतीचा दुर्देवी मृत्यु झाला, त्यावेळी पिडीत कुटूंबियांना आ.सुधीर मुनगंटीवार यांनी आंबटकर कुटूंबियांचे सांत्वन केले. आंबटकर कुटूंबियांना मदतीचा हात दिला. त्यावेळी परिसरात पोलिस चौकी उभारण्याची मागणी भाजपा कार्यकर्ते व नागरिकांनी सुधीरभाऊंकडे केली होती.ती मागणी सुधीरभाऊंनी पुर्ण केली. त्याच दरम्यान बाबुपेठ प्रभागातील रस्ते व नाली बांधकामाबाबत सुधीरभाऊंना विनंती करण्यात आली. भाऊंनी शब्द दिला व तो त्यांनी पूर्ण केला . रस्त्यासाठी 16.84 कोटी रू. निधी त्यांनी मंजुर केला. विकासाप्रती असलेली तळमळ हे सुधीरभाऊंची विशेषता आहे असे ते म्हणाले. या आधीही भाऊंनी या परिसरात बाबुपेठ उड्डानपुलासाठी निधी मंजूर केला आहे. भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम निसर्ग उद्यान, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी स्टेडीअम अशी अनेक विकासकामे पुर्णत्वास आली आहे,असे ते म्हणाले.
यावेळी डॉ गुलवाडे म्हणाले,दिलेला शब्द पाळणे,त्याला जागणे हा आ मुनगंटीवार यांचा स्वभाव आहे.संसदीय आयुधांचा वापर करून विकासनिधी खेचून आणण्यात ते कधीच कमी पडले नाही.सत्ता असो की नसो,आ मुनगंटीवार यांच्या विकासाच्या रथाची गती कधी कमी झाली नाही.
यावेळी महापौर कंचर्लावार व उपमहापौर राहुल पावडे यांनी समयोचित मार्गदर्शन केले.यावेळी गणेश गेंडाम,कुणाल गुंडावार, हिमांशू गादेवार,राजेश यादव,सागर भगत, आकाश ठुसे,सुरेश,दिवाकर पुद्दटवार, नंदकिशोर गनू वार,दशरथ सोनकुसरे,विवेक शेंडे,सुनील डोंगरे, डॉक्टर प्रमोद रामटेके, विजय मोगरे, बंडूभाऊ पदमलवार, रेखा चन्ने, पराग मालोदे, जयेंद्र गुरवार, विजय रामगिरवार,मंगेश तामगाडगे, निलेश मल्लेलवार, रघु गुंडला,मुकेश गाडगे, मारोती पारपल्लीवार शांताराम भोयर, राजू दागमवार,अनिल शेंडे, अविनाश हिंगाणे,दौलत नगराळे,राजेश थुल,राजू राऊत,चंद्रकला ठेंगणे,वासू देशमुख,विद्या बाथो,पाटील मॅडम यांनीं आतषबाजी करीत जल्लोष केला.
आ.मुनगंटीवार यांनी व्हिडीओ कॉलिंग द्वारे दिला संदेश.
याप्रसंगी नागरिक व कार्यकर्त्यानीं व्हीडिओ कॉलिंग द्वारे आ.सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले.आ मुनगंटीवार म्हणाले,शेवटच्या माणसाची,शेवटच्या क्षणा पर्यंत सेवा करणे हा आमचा संकल्प आहे.सत्ता असो की नसो,विकास हेच आमचे ध्येय आहे.नागरिकांची साथ असली की,विकासकार्याला गती मिळते.असे ते म्हणाले