भाजपाच्या राष्ट्रसेवेने प्रत्येकाच्या मनाला स्पर्ष केला.

भाजपाच्या राष्ट्रसेवेने प्रत्येकाच्या मनाला स्पर्ष केला.

भाजपाच्या राष्ट्रसेवेने प्रत्येकाच्या मनाला स्पर्ष केला.——–

राष्ट्रसेवा आणि जनकल्याणाचे लक्ष समोर ठेऊन, ४२ वर्षापूर्वी भाजपाचे बिजारोपण झाले. वेळेनुसार संघर्षाचे उन्हाळया -पावसाळयाचे चटके सहन करत, भाजपाचे रोपटे आज भारतीय राजकारणाच्या पटलावर क्रमांक एक चा भव्य वृक्ष झाला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्काराने राष्ट्रवादाला नेहमीच मन- मष्तिष्काला उर्जा दिली आहे. भाजपाचा प्रत्येक कार्यकर्ता आपल्या परिवाराची जबाबदारी समजून स्वत:ला राष्ट्रसेवेला समर्पित शिपाई समजून झोकून देत आहे. या प्रवासातील अनेक अडथडे पार करत, रा. स्व. संघाप्रमाणेच भाजपालाही राजकीय विरोधी जहराचे सेवन करीत लक्ष गाठावे लागले. दरम्यान संघ व भाजपाला सांप्रदायिक शक्तिंनी सांप्रदायिक ठरविण्याचे अभियान सुद्धा चालविले . पण, हार किंवा विजयाची किंचितही काळजी न करता, भाजपाने उत्साह कायम ठेवला. आता भाजपाचे चांगले दिवस आले आहे. सद्दस्थिति अशी आहे की, भाजपाची संघठन शक्ति व लोकप्रियतेच्या बाबतीत अन्य दल दूर– दूर पर्यंत कोठेच दृष्टिपथास पड़त नाही. देशातच नव्हे तर भाजपा जगात सर्वाधिक सदस्य संख्या असलेली पार्टी समोर आली आहे. भाजपाच्या या यशस्वी वाटचालीसह पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा बोलबाला संपूर्ण जगात पोहचण्यासाठी अनेक दिग्गज नेत्यांचे योगदान विसरू शकत नाही. सन. १९५० मध्ये देश स्वतंत्र झाल्यानंतर १९५१ मध्ये शामाप्रसाद मुखर्जींनी जनसंघाची निर्मिर्ती केली. लक्ष स्पष्ट होते, लोकशाही बळकट करने. परंतु, परिवारवादी राजकीयांनी जनसंघाच्या मार्गात रोडे आणण्यात बिलकुल कसर सोडली नाही. लोकशाहीचा गळा घोटल्या गेला. तेव्हाची आपात्कालीन स्थिति देश व जग कधीच विसरू शकत नाही. त्यानंतर भारतीय राजकारणात नवी क्रांति आणण्याच्या उद्देश्याने १९७७ साली जनता पार्टीचा उदय झाला. त्यात जनसंघाचे विलनिकरण झाले. तेव्हा लोकसभेच्या २९५ जागा जिंकत जनता पार्टीने देशाची सत्ता प्राप्त केली. परंतु, वैचारिक संघर्षात ३० महिन्यांत जनता पार्टीला सत्तेपासून दूर व्हावे लागले. अशा परिस्थितित सर्वश्रेष्ठ नेते अटल बिहारीजी, लोहपुरुष लालकृष्ण आडवाणी यांच्या नेतृत्वात शामाप्रसाद मुखर्जीं, पं. दिनदयाल उपाध्याय, पं. बच्छराज व्यास यांच्या विचार व नीतींना अनुरूप नवीन राजकीय पार्टी तयार करण्याचा विचार प्रत्यक्षात उतरविला, ६ एप्रिल १९८० रोजी मुंबई येथील अधिवेशनात भारतीय जनता पार्टी ची स्थापना झाली. अटल बिहारी संस्थापक अध्यक्ष झाले. पुढे १९८६ पर्यंत ते या पदावर विराजमान राहिले. दरम्यान १९८४ मध्ये भाजपाने पूर्ण ताकदीनिशी लोकसभा निवडणूक लढविली. त्यात भाजपा मताधिक्यात देशात दुस-या क्रमांकाची पार्टी म्हणून उदयास आली. परंतु, त्या निवडणुकीत भाजपाचे फक्त दोन उमेदवार विजयी झाले होते. कारण, तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या हत्येमुळे देशातील जनता भाऊक झाली होती. त्या भाऊकतेचा काॅग्रेसला फायदा झाला. त्यानंतर १९८६ मध्ये लालकृष्ण आडवाणीं भाजपाचे अध्यक्षपदी आरूढ़ झाले. त्यानंतर अटल -अडवाणींनी १९८९ मध्ये पार्टी मजबूत करण्याचा निर्धार केला. तेव्हा गठबंधनाचा अनुभव घेत भाजपाने लोकसभा निवडणुकीत ८५ जागा जिंकल्या. तेव्हा भाजपाचे मदतीने जनतादलाचे विश्वनाथ सिंह पंतप्रधान झाले. गठबंधनात असतानाही भाजपाने आपल्या विचारांना बाजूला न सारता,जनभावनेला प्राधान्य दिले. दरम्यान जनतादलाची साथ सुटली. जनतेला अपेक्षीत असलेल्या अयोध्येत भव्य राम मंदिर निर्मिर्तीचा विचार भाजपाने हेरला आणि १९९० मध्ये लालकृष्ण आडवाणीं यांच्या नेतृत्वात सोमनाथ ते अयोध्या रथयात्रा काढली. याञेचे सारथत्व नरेंद्र मोदी यांनी केले. ” रामलला हम आयेंगे– मंदिर वही बनायेंगे ” चा नारा दिला. १९९१ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने १२० जागा जिंकल्या, तेव्हा मुरलीमनोहर जोशी भाजपाचे तिसरे अध्यक्ष झाले. १९९५ दरम्यान भाजपाने देशभरात विस्तार वाढविला. पण, भाजपाला सत्तेपासून दूर रहावे लागले. दरम्यान लोकसभेसह बहुतांश विधानसभेतही भाजपाचा प्रभाव वेगाने वाढू लागला. रामराज्याची संकल्पना जनतेला प्रचंड भावली आणि १९९६ मध्ये भाजपाने लोकसभेत १६१ जागा जिंकल्या. तेव्हा गठबंधनात अटल बिहारी दुस-यांदा पंतप्रधान झाले. पण, हे सरकार १३ दिवसीय ठरले. पुन्हा निवडणुका झाल्या आणि १९९९ मध्ये भाजपाच्या नेतृत्वात एनडीएने ३०३ जागा जिंकल्या, अटलजी तिस-यांदा पंतप्रधानपदी आरूढ़ झाले. अटल बिहारी यांच्या नेतृत्वातील सरकार राष्टसेवा आणि जनकल्याणकारी ठरले. दरम्यान भाजपाची प्रतिमा खराब करण्याचा आटोकाट प्रयत्न झाला. पण, भाजपाला जनहिताची राजनीति करण्यात प्रचंड यश आले. दरम्यान काॅग्रेसने षड्यंत्र रचून वापसीचा खूप प्रयत्न केला.पण, त्यात काॅग्रेस चांगलीच तोंडघशी पडली. २००८ मध्ये देशातील दक्षिण क्षेत्र कर्नाटक, गुजरात, मध्यप्रदेशसह काही राज्यांमध्ये भाजपाचे आलेली सरकारे जनताजनार्दनाच्या हितार्थ काम करीत असताना, भाजपाला जनतेचे भरभरून प्रेम प्राप्त होत राहिले. २०१४ साली लोकसभा निवडणुकीत भाजपाला स्वबळावर २८२ जगांवर विजय मिळाला, आणि भाजपाचे मुख्यमंत्री राहिलेले नरेंद्र मोदी देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले. दरम्यान भाजपाचे संघटन अधीक मजबूत झाले. हे सरकार जनतेला आपलेसे वाटायला लागले, कारण, मोदी सरकार ने केवळ जनहितार्थ कामांचा ध्यास घेऊन, वाटचालीला वेग दिला. सबका साथ– सबका विकास हे ब्रिद घेऊन, मोदींच्या नेतृत्वातील सरकार जनतेचा बुलंद आवाज़ झाले. परिणामस्वरूप २०१९ साली नरेंद्र मोदी दुस-यांदा प्रधानमंत्री निवडल्या गेले. भाजपाला अध्यक्ष म्हणून कुशाभाऊ ठाकरे, लक्षमण बंगारू, जन. कृष्णमूर्ति, वेंकैया नायडू, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, अमित शाह, जगत प्रसाद नडडा यांचे सक्षम नेतृत्व लाभले.तरुण, तरुणी, महिला, वृद्ध आणि गरजूंसाठी भाजपा महत्वपूर्ण भूमिका वठवित आहे. सर्वच वर्गातील नागरिकांच्या हितार्थ भाजपा अग्रेसर असून, भाजपा व सरकारची सर्वञ प्रशंसा होत आहे.” सबका साथ–सबका विश्वास, सबका- विकास ” या घोषवाक्याला विश्वासात उतरविण्याच्या उद्देश्याने भाजपा महानगर, जिल्हा, मंडळ, प्रभाग ते बुथ अंतर्गतच्या सर्वच मतदारांपर्यंत विविध लहान–मोठया कार्यक्रमांच्या माध्यमातून पोहचत आहे, त्यामुळे भाजपाप्रति जनतेमध्ये सहानुभूति निर्माण झाली आहे.

६ एप्रिल भाजपाच्या स्थापना दिवसानिमित्त कार्यकर्त्यांसह समस्त स्नेहींना हार्दिक शुभेच्छा :

चंदन गोस्वामी, भाजपा: प्रवक्ता पॅनेलिस्ट, भाजपा महाराष्ट्र….

Updated : 4 April 2022 4:28 PM GMT

Shubham Gote

Mr. Shubham Gote is involved in the day-to-day operations of the company along with the business expansion strategies of the print media division of the group. He also supervises the performance of the company in terms of the business plans. He has been on the Board of the Company since November 2009.

Leave a Reply

Your email address will not be published.