भाई अमन यांनी दिलेल्या ईशाऱ्यामुळे पोस्ट ऑफिस चौक ते हनुमान आखाडा चौकातील नव्याने केले डांबरीकरण

भाई अमन यांनी दिलेल्या ईशाऱ्यामुळे पोस्ट ऑफिस चौक ते हनुमान आखाडा चौकातील नव्याने केले डांबरीकरण

यवतमाळ -: नगर परिषद निवडणूक येत्या काही महिन्यांवर आल्याने शहरात रस्त्याच्या कामाचा व डांबरीकरणाचा सपाटा सुरू आहे. यवतमाळ शहरातील प्रमुख मार्ग असलेला पोस्ट ऑफिस ते हनुमान आखाडा चौकापर्यंत करण्यात आलेल्या रस्त्यावर काही दिवसापूर्वी रस्त्याचे डांबरीकरणाची करण्यात आले होते मात्र ते काम अत्यंत निकृष्ठ दर्जाचे असल्याने दोन दिवसांतच रस्त्या उखडायला सुरुवात झाली होती याची दखल घेत सामाजिक कार्यकर्ते भाई अमन यांनी त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी करुन त्या रस्त्याचे काम दर्जेदार न झाल्यास आंदोलनाचा ईशारा दिला होता.

संबंधित कामाची गुणनियंत्रण विभागाकडून तपासणी करून त्या संबंधित कंत्राटदाराची सखोल तपास करावा तसेच त्याला काळ्यायादीत टाकावे व परवाना रद्द करावा व यामध्ये कामात हलगर्जीपणा केल्याने दोषी असलेल्या नगरपरिषदेचे अभियंत्यावर कारवाईची मागणी केली.मात्र या ईशाऱ्यामुळे कंत्राटदारासह नगरपरिषद प्रशासनाचे चांगलेच धाबे दणाणले.

यामुळे लवकरच त्यांनी नविन रस्ताचे डांबरीकरण केले.यामुळे यवतमाळकरांचा वतिने भाई अमन यांचे सर्वत्र आभार व्यक्त करण्यात आले.

Updated : 24 Jan 2022 8:10 PM GMT

Shubham Gote

Mr. Shubham Gote is involved in the day-to-day operations of the company along with the business expansion strategies of the print media division of the group. He also supervises the performance of the company in terms of the business plans. He has been on the Board of the Company since November 2009.

Leave a Reply

Your email address will not be published.