भजन,कीर्तनातून मोदींना आश्वासनांचे स्मरण गुरुदेव युवा संघाचे अनोखे आंदोलन कुठे गेले 'अच्छे दिन'

भजन,कीर्तनातून मोदींना आश्वासनांचे स्मरण

गुरुदेव युवा संघाचे अनोखे आंदोलन

कुठे गेले 'अच्छे दिन'

भजन,कीर्तनातून मोदींना आश्वासनांचे स्मरण

गुरुदेव युवा संघाचे अनोखे आंदोलन

कुठे गेले ‘अच्छे दिन’

यवतमाळ : ‘अच्छे दिन आऐंगे’ असे जनतेला फसवे आश्वासन देऊन मोदींनी सत्ता मिळविली. मात्र आश्वासनाची पूर्तता केली नाही उलट जीवनावश्यक वस्तू महाग केल्या.त्यामुळे त्यांना आश्वासनांचे स्मरण करण्यासाठी गुरुदेव युवा संघाने त्यांच्या प्रतिमेपुढे भजन,कीर्तन करून अभिनव आंदोलन केले.

मोदी सरकारची दुसरी कारकीर्द सुरू आहे. महागाईचा भस्मासूर दरदिवशी सामान्य जनांना छळत आहे. मोदींनी सत्तेच्या गादीवर बसण्यापूर्वी महागाई कमी करण्याचे मोठे आश्वासन दिले होते मात्र त्याच्या उलट झाले.आजच्या घडीला पेट्रोल ११९ रुपये प्रति लिटर, गॅस १ हजार पार, तेल १५० रुपये किलो, दूध ६० रुपये लिटर झाले.जीवनावश्यक वास्तूसह बियाणे,शेती साहित्य महागल्याने सामान्य जनता महागाईत भरडली जात आहे. वाढत्या महागाईस मोदी सरकार कारणीभूत असल्याचे म्हणत गुरुदेव युवा संघाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेपुढे कीर्तन,भजन गाऊन त्यांना आश्वासनांची आठवण करून दिली. मोदी सरकारने वाढत्या महागाई व बेरोजगारीचा प्रश्न निकाली काढावा व सर्वसामान्यांच्या हिताचे धोरण आखावे, अशी मागणी याप्रसंगी गुरुदेव युवा संघाचे मनोज गेडाम, समाधान रंगारी, भाऊराव वासनिक, पवन मडावी, स्वप्नील कोकांडे प्रल्हाद खोब्रागडे या आंदोलकांनी केली.

उज्वलाची शेगडी विकून चुलीवर स्वयंपाक

विशेषतः ग्रामीण महिलांना चूलीपासून मुक्ती देण्यासाठी मोदींनी उज्वला गॅस योजना अंमलात आणली त्यानुसार अनेकांना गॅस शेगडी देण्यात आल्या. मात्र गॅस भरून आणण्यासाठी १ हजार रुपये मोजावे लागत असल्याने ग्रामीण आणि शहरी भागातील अनेकांनी या शेगड्या विकून पुन्हा चुलीवर स्वयंपाक मांडला आहे.त्यामुळे या योजनेचा सध्यातरी बट्याबोळ वाजल्याचे चित्र आहे.

‘ क्या हुआ तेरा वादा’

‘ अच्छे दिनाऐवजी वाईट दिवस सर्वसामान्य जनता अनुभवत आहे. नरेंद्र मोदींनी २०१४ सालच्या निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांना पाळावे,यासाठी गुरुदेव युवा संघाच्या आंदोलकांनी ‘ क्या हुआ तेरा वादा’ या सिनेगीतावर चाल धरून अभिनव आंदोलन केले.

Updated : 2022-04-04T01:40:03+05:30

Shubham Gote

Mr. Shubham Gote is involved in the day-to-day operations of the company along with the business expansion strategies of the print media division of the group. He also supervises the performance of the company in terms of the business plans. He has been on the Board of the Company since November 2009.

Leave a Reply

Your email address will not be published.