भंडारदरा परिसरातील पर्यटन व्यवसायकांवर उपासमारीची वेळ

भंडारदरा परिसरातील पर्यटन व्यवसायकांवर उपासमारीची वेळ

म मराठी न्यूज नेटवर्क अहमदनगर

प्रतिनिधी विठ्ठल खाडे

अहमदनगर/अकोले:- परिसरात शासनाच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भंडारदरा विभागाने वन आदेशानुसार ५० टक्के निर्बंध असताना पर्यटन व्यवसाय १०० टक्के बंदी घातली आहे या परिसरात पर्यटकांना बंदी घातल्याने या परिसरातील व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे . त्यामुळे शासनाच्या आदेशानुसार भंडारदरा परिसरातील ५० टक्के पर्यटन व्यवसाय सुरू करण्यास परवानगी मिळावी , यासाठी भंडारदरा परिसरातील छोटे – मोठे व्यावसायिकांनी माजी आमदार वैभवराव पिचड यांना साकडे घातले . यावेळी त्यांनी राजूर येथे निवासस्थानी निवेदन दिले यावेळी माजी आमदार वैभवराव पिचड यांनी पर्यटन व्यावसायिक यांच्याअडचणी समजावून घेऊन शासन दरबारी या बाबत पाठ पुरावा करू असे आश्वसित केले . यावेळी सोमनाथ रॉगटे , रोहिदास ईदे , अशोक ईदे लालू ईदे , पांडुरंग पेडेकर , एकनाथ खाडे दिनकर पेढेकर , रवी वैराट आदींसह अनेक युवक उपस्थित होते .

या निवेदनात पर्यटन व्यावसायिक यानी म्हटले आहे की , आम्ही सर्व छोटे मोठे हॉटेल व्यावसायिक , कॅपिंग व्यावसायिक असून भंडारदरा परिसरात पर्यटकांना बंदी घातल्याने आमच्या वर उपासमारीची वेळ आलेली आहे . सर्व धंदे बंद पडले आहेत . या क्षेत्रात अनेक पर्यटनस्थळे असल्याने मोठ्या प्रमाणावर पर्यटक या भागात येत असतात त्यामुळे आम्हाला छोट्यामोठ्या व्यवसाय चालू असून आमचा रोजगार त्यावर अवलंबून आहे त्यावरच आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालू आहे . मात्र वन विभागाने सदर पर्यटन क्षेत्रात पर्यटकांना येण्यास बंदी घातल्याने आमचा रोजगार बुडाला आहे . आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे . कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणे मुश्किल झालेले आहे . आदिवासी प्रकल्प विभाग , आदिवासी विकास विभाग यांच्यावतीने आम्हाला छोटे व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत केली आहे सध्या कोव्हिडचा काळात शासनाने ५० टक्के निर्बंध घातलेले असताना वन विभागाने आमचे सर्व व्यवसाय १०० टक्के बंद केलेले आहेत . शासनाच्या आदेशानुसार भंडारदरा परिसरातील व्यवसायांना ५० टक्के व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी अशी विनंती केली आहे .

Updated : 23 Jan 2022 11:55 AM GMT

Shubham Gote

Mr. Shubham Gote is involved in the day-to-day operations of the company along with the business expansion strategies of the print media division of the group. He also supervises the performance of the company in terms of the business plans. He has been on the Board of the Company since November 2009.

Leave a Reply

Your email address will not be published.