बोधिसत्व स्तंभाचे थाटात अनावरण!

स्थानिक यवतमाळ शहरात असलेल्या अंबिका नगर परिसरातील विशाखा बुद्धविहाराचे प्रांगणात, कृष्णाजी मेश्राम यांचे स्व कमाईतून बोधिसत्व संभाचे निर्माण करण्यात आले. आज दिनांक 8 एप्रिल रोजी वैश्विक विचारवंत आदरणीय राजरत्न साहेब आंबेडकर यांचे हस्ते बोधिसत्व स्तंभाचे अनावरण करण्यात आले. या अनावरण सोहळ्याच्या कार्यक्रमाप्रसंगी शहरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणारे शासकीय फलाटावर अत्यंत अत्यंत प्रशंसनीय कामगिरी दाखविणारे अधिकारी प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत होते. यात प्रामुख्याने जिल्हा उपनिबंधक रमेश कटके, यवतमाळ तहसील चे तहसीलदार कृणाल झाल्टे, यवतमाळ शहर ठाण्याचे ठाणेदार नंदकिशोर पंत, सहाय्यक ठाणेदार खंडेराव, डॉ. विजय मून डॉ. श्रीकांत मेश्राम, डॉ. श्रीकांत पठाडे, ज्येष्ठ समाजसेविका प्रमोदिनी रामटेके, तसेच सर्वच माजी नगरसेवक / सेविका उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला भीम गीताचा कार्यक्रम प्रसिद्ध गायक सुनील पाईकराव यांनी पार पाडला. याप्रसंगी आपले विचार व्यक्त करीत असताना, प्रास्ताविक पर दारूबंदी व्यसनमुक्ती आंदोलनाचे प्रमुख उमेश मेश्राम म्हणाले की, जगाच्या पाठीवर तथागत बुद्धाच्या धम्मच व्यसनमुक्ती च्या बाजूने भरभक्कम पणे उभा राहू शकतो. कार्यक्रमाची औपचारिकता बाजूला ठेवून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेली जिल्हा उपनिबंधक यवतमाळ रमेश कटके म्हणाले, माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय दोन गोष्टी आहेत त्यात एक म्हणजे अकोला या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची सभा झाली असताना, माझी आई जी दहा वर्षाची होती. ती बाबासाहेबांच्या सभेत जाऊन बाबासाहेबांचे विचार कानाद्वारे मनात घट्ट करून आली व आम्हाला मग ती वारंवार या गोष्टीची आठवण करून द्यायची की, प्रत्येक मुलीला व मुलाला उच्च शिक्षणाच्या दिशेने शक्य होईल ती मदत केली पाहिजे व बांधवांनो झाले तसेच, आम्ही आज आमच्या घरात चारही भावंड उच्च प्रथम श्रेणीचे अधिकारी म्हणून कार्यरत आहोत”. तसेच या स्तंभाच्या अनावरण सोहळ्याचे प्रमुख पाहुणे आदरणीय राजरत्न साहेब आंबेडकर यांनी आपल्या प्रमुख मार्गदर्शनात अत्यंत सखोल असे बौद्ध तत्त्वज्ञानावरील विचार हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या जनतेसमोर ठेवले. ते म्हणाले ” जग विध्वंसाच्या दिशेने जात आहे. अलीकडच्या काळात सध्या स्थितीत जगात सुरू असलेल्या वर्चस्वाच्या लढाईत मानवता पूर्णपणे संपलेली आहे. अखिल विश्वाचे विध्वंस होण्याची चिन्हे दिसून येत आहे. या सगळ्या अमानवीय घटनांना थांबवायचे असेल तर जगाला बुद्धा शिवाय पर्याय नाही. सोबतच भारत देशात असलेली जातीव्यवस्था संपवायची असेल तर बुद्ध विचारच ही जाती व्यवस्था संपवू शकते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन अरुण गाडे यांनी केले. याप्रसंगी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सामाजिक कार्यकर्ते संतोष पाटील, रितेश मुन, विजय धुळे, अध्यक्ष वनकर ताई, वंदना उरकुडे, करुणा चौधरी, कुंदा सूर्यवंशी, ज्योती खोब्रागडे, मंगला मेश्राम, सुदाम वनकर, राजेश मेश्राम, जयप्रकाश चव्हाण, रामदास रंगारी, पंजाब चव्हाण, घनश्याम डोंगरे, धम्म बंधू दीपक पाटील, विशाखा महिला मंडळाच्या समस्त पदाधिकारी व विशाखा पुरुष मंडळाचे समस्त बंधू, इत्यादींनी अथक परिश्रम घेतले…..