बेलोरा टाकळी-जेना प्रकल्पग्रस्तांना नव्या दराने मोबदला द्यावाच लागेल प्रकल्पग्रस्तांची मागणी न्यायोचित:- हंसराज अहीर


चंद्रपूर – बेलोरा येथील कोलमाईन्स करीता सन 1999-2000 मध्ये संपादीत केलेल्या शेतजमिनींना कवडीमोल दर मिळाल्याने व गेल्या 22 वर्षात हा उद्योग सुरू न झाल्याने नव्या प्रबंधनाने यापूर्वी संपादीत केलेल्या जमिनींचा नव्या दराने मोबदला द्यावा व सबंधीत प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्यात सामावून घ्यावे या आशयाचे निवेदन टाकळी, बेलोरा, जेना, कीलोनी येथील प्रकल्पग्रस्त शेतकरी व कामगारांनी पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्राी हंसराज अहीर यांची प्रत्यक्ष भेट घेवून सादर केले.
सेंट्रल काॅलरीज कंपनी लिमी. व्दारा बेलोरा येथील कोलमाईन्स करीता सन 2000 मध्ये टाकळी, बेलोरा, जेना व कीलोनी येथील शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी नोकरीचे आमीष देत कवडीमोल भावाने संपादीत करण्यात आल्या होत्या. अवघ्या दोन वर्षामध्येच काही कारणास्तव ही खाण बंद करण्यात आली. ज्यामुळे नोकरीस लागलेल्या प्रकल्पग्रस्तांवर घरी बसण्याची पाळी उद्भवली सोबतच सुपीक जमिनी कंपनीच्या घशात गेली. संबंधीत शेतकÚयांचे अतोनात नुकसान होवून त्यांच्यावर उपासमारीचे संकट उद्भवले आहे. सध्या ही कोलमाईन्स अरविंदो इन्फ्रास्ट्रक्चर रिअॅलीटी प्रा. लिमी. हैदराबाद या कंपनीस आॅक्शनवर मिळाल्याने नव्या प्रबंधनाव्दारे या सर्व संपादीत जमिनीचा मोबदला नव्या दराने देण्यात यावा व प्रकल्पपिडीत कुटूंबातील सदस्यास नोकरी दिली जावी अशी या प्रकल्पग्रस्तांची न्यायोचित मागणी आहे.
पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्राी हंसराज अहीर यांनी मागील 22 वर्षांपासून या जमिनी धुळखात पडल्या असल्याने प्रकल्पग्रस्तांची मागणी न्यायोचित असून या मागणीच्या पुर्ततेसाठी प्रकल्पग्रस्तांच्या सोबतीने संघर्ष करण्याचे आश्वासन त्यांना भेटलेल्या शिष्टमंडळाला दिले. जिल्हा प्रशासनाने या प्रकल्पग्रस्तांच्या भावनांची व त्यांनी केलेल्या न्याय मागणीची गांभीर्याने दखल घेवून या अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी शासकीय स्तरावर पुढाकार घ्यावा अशी भूमिका अहीर यांनी यावेळी झालेल्या चर्चेत घेतली. एका प्रकल्पासाठी मोबदल्यासंदर्भात वेगवेगळे निकष लावण्याच्या भानगडीत न पडता नव्याने सुरू होणाÚया या कोलमाईन्समध्ये आतापर्यंत संपादीत केलेल्या व यानंतर संपादीत होणाÚया शेतजमिनीसाठी एकच दर लावून यापूर्वी जमिनीपोटी मिळालेला मोबदला परत घेवून नवीन बाजार मुल्यानुसार संपादीत झालेल्या सर्वच जमिनींना एकच मोबदला दिला जावा अशी भूमिका या प्रकल्पग्रस्तांशी केलेल्या चर्चेदरम्यान अहीर यांनी घेवून या प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळेपर्यंत संघर्ष केला जाईल अशी ग्वाही त्यांनी या शिष्टमंडळाला याप्रसंगी दिली.
प्रकल्पग्रस्तांच्या या शिष्टमंडळात भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष आकाश वानखेडे, बंडु गाडगे, गणपत अवताडे, विस्मय बहादे, गोकुल बुच्चे, रेवनाथ रामटेके, श्रीकृष्ण झाडे, रामदास कायरकर, अनिल बुच्चे, चैतन्य कोहळे व इतरांचा समावेश होता.