बीड मधील "माफियांना" सर्दी ! पोलीस अधीक्षक आर राजास्वामी यांची बदनाम झालीय वर्दी!

बीड मधील "माफियांना" सर्दी ! पोलीस अधीक्षक आर राजास्वामी यांची बदनाम झालीय वर्दी!

——————————————————

लेखक.श्री.तानाजी सखाराम कांबळे.

दि.आठ मार्च दोन हजार बावीस,

मंगळवार विशेष

—————————————————-

आमचा आजा भाऊमा कांबळे,माझ्या लहानपणी

आधी मध्ये कधीतरी मला सांगायचा,

लेका,अंगात “पावर”पाहिजे!

घोडा “उधळल्या” सारखी!

आणि त्यासाठी “4 येताच” जास्तीच शिक्षण पाहिजे!

असा अट्टाहास भाऊमाचा सारखा असायचा.

बदलत्या काळाच्या ओघात,ही “पावर” खुर्चीवर बसणाऱ्या अनेकांना प्रशासनातून,तसेच निवडून जाऊन पुढारी म्हणून मिळाली.

मात्र खुर्ची वरती बसताचक्षणी प्रत्यक्ष वर्दी अंगात चढल्यावरती अशा अनेकांना “भूत” संचारलागत,न जाणो कुठून एवढी भाऊमाचे भाषेत “पावर” येते,आन घोडा “उधळायचे” आधीच “लगाम” खेचायची पाळी येते.कधी कधी मग अशी जास्तीची शिकलेली ” पावर” लाखो लोकांच्या जीवन-मरणाच्या मुळाशी उठते!

पुस्तका बाहेरच ही एक जग असतं व त्याचा अभ्यास अशी जास्तीची “चार येत” शिकलेली का करत नाहीत.

तीन पाठ पळून,कायद्याचे अर्धवट ज्ञान असताना,बारा इंच अर्धवट छाती फुगून सामान्यांना काठीची भीती घालणारा तो पोलीस कॉस्टेबल,आण चार यत जास्तीची शिकून “बारा हत्तीचं बळ” अंगात संचारलागत “पावर” आल्याचा भास दाखवणारे असे अधिकारी,यांच्या शासकीय निवासस्थानाचे दरवाज्या वरच्या गेट वरतीच लांबून नमस्कार आणि वंदन करणे,स्वातंत्र्यानंतर देशाच्या 75 व्या वर्षानंतर समग्र लोकशाहीत तेवढेच शिल्लक राहिले आहे.

बीड जिल्ह्याचे उगमस्थान

म्हणून ओळख असणाऱ्या महत्त्वाच्या गोदावरी नदी काठावरून संथपणे वाहत जाणारे गोदावरीचे पाणी,सध्या महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशनाच्या तारांकित प्रश्‍नाच्या माध्यमातून गढूळ झाले आहे.या गोदावरी नदी काठावरील,जिल्हाभरात सध्या वाढलेले,अवैध व्यवसाय,जिल्हा दंडाधिकारी कार्यालय बीड च्या आवारात झालेला गोळीबार,दिवसाढवळ्या होणारे खून, मारामारी,चोरी,बलात्कारदह शतीचे पसरलेले साम्राज्य,व यास कारणीभूत ठरलेले बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांना राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सक्तीच्या रजेवर ती पाठविण्याबाबत चा घेतलेला निर्णय मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात लक्षवेधी ठरलेला आहे.

बीड जिल्ह्यातील वाढत्या गुन्ह्यांचे प्रमाण आणि बिघडलेली कायदा आणि सुव्यवस्था यावर राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके, संदीप क्षीरसागर, बाळासाहेब आजबे यांनी थेट अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित केला. सोमवारी विधानसभेत राष्ट्रवादीच्या आमदारांनीच सरकारला घरचा आहेर दिल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपच्या स्थानिक आमदार नमिता मुंदडा यांनी पोलीस अधीक्षक राजा रामास्वामी यांना निलंबित करण्याची मागणी केली. आमदार सोळंके यांनी तर पोलीस अधीक्षक बदल्यांसाठी पैसे घेतात. अवैध धंद्यांवाल्यांकडून हप्ते घेतात. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली, असा गंभीर आरोप केला. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ही बाब गंभीर आहे, असे सांगत पोलीस अधीक्षक राजा रामास्वामी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे आणि पंधरा दिवसात चौकशी करून कारवाई करण्याची घोषणा केली. यामुळे पालकमंत्री धनंजय मुंडे यांची पक्षाच्याच आमदारांनी सभागृहात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करून कोंडी केल्याने मुंडे एकाकी पडल्याचे चित्र लपून राहिले नाही.

जिल्ह्यात राष्ट्रवादीचे चार आणि भाजपचे दोन आमदार आहेत. अडीच वर्षांपूर्वी धनंजय मुंडे यांच्याकडे पालकमंत्री पदाची धुरा आली. मंत्रिमंडळात संधी न मिळाल्यामुळे सुरुवातीलाच आमदार प्रकाश सोळंके यांनी राजीनामा अस्त्र उपसले होते. तेव्हापासून जिल्ह्यातील आमदार व प्रमुख पदाधिकारी यांच्यातील छुपा संघर्ष अनेक कार्यक्रमामधून दिसून आला. काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे समर्थक जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांच्या जागी तिन्ही आमदारांनी एकमताने मागणी करून अ‍ॅड. राजेश्वर चव्हाण यांची नियुक्ती केली. मागील महिन्यात भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी थेट गृहमंत्र्यांना पत्र लिहून बीड जिल्ह्यातील वाढत्या चोऱ्या, खून, मारामाऱ्या, महिलांवरील अत्याचार, घातक शस्त्रांचा वापर राजरोसपणे होत असून या गुन्हेगारीला अभय कोणाचे, असा प्रश्न करत पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला होता.

बीड शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील मुद्रांक कार्यालयातील भरदुपारी झालेला गोळीबार, परळीतील बहीण-भावाचा खून, परळीतच पैशाच्या व्यवहारातून महिलेचा खून, अंबाजोगाई तालुक्यातील बागझरी येथील तीन चिमुकल्यांसह आईचा संशयास्पद मृत्यू, गेवराई व परळीत मृतदेहांचे सांगाडे आढळणे, आडसमध्ये काकाचा पुतण्यानेच केलेला खून, सिरसदेवीमध्ये झोपेतच दोघांवर धारदार शस्त्राने हल्ला, बीडमध्ये बहिणीसह नियोजित वरावर भावाचा हल्ला, परळीत जुन्या रेल्वे स्थानकाजवळ युवकावर हल्ला, आष्टी तालुक्यातील वटाणवाडी येथे महिलेचा खून या गंभीर घटनांनी जिल्हा हादरला. एवढेच नव्हे तर परळीतील संभाजीनगर ठाण्यातील अल्पवयीन मुलीवर शेजाऱ्याकडून झालेला अत्याचार, परळी ग्रामीण ठाण्यात अल्पवयीन मुलीवर झालेला अत्याचार या सारख्या गंभीर व अंगावर थरकाप आणणाऱ्या घटनांचा हा लेखाजोखा आहे. यासह चोरी, अवैध वाळूउपसा, अवैध धंदे, शिवीगाळ, जीवे मारण्याच्या धमक्या, मारामाऱ्या, शासकीय कामात अडथळा आदी गुन्ह्यांची संख्याही मोठी आहे.

एसपीं विरोधात पोस्ट,जिल्हाध्यक्षांवर गुन्हा.

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आपचे जिल्हाध्यक्ष अशोक येडे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली. यात त्यांनी पोलीस अधीक्षकांनी राजीनामा द्यावा,अशी मागणी केली होती. यावर सुधारणा करण्याऐवजी शिवाजीनगर पोलिसांनी येडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. कोणी आवाज उठविला तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करून आवाज दाबण्याचा प्रयत्न पोलीस करत असल्याचे यावरून दिसत आहे. पोलिसांच्या विरोधात कोणी बोलायचेच नाही? असा काहीसा नियम पोलिसांनी लावल्याची चर्चा आहे. पोलिसांविरोधात बातम्या छापल्या तरी त्यांना नोटीस पाठविण्यासह गुन्हे दाखल करण्याचा इशाराही दिला जात असल्याची पत्रकारांमध्ये चर्चा आहे.

पंकजा मुंडेंनी उठविला आवाज

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडली असून याला सत्ताधारीच जबाबदार असल्याचा आरोप भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी केला होता. तसेच गृहमंत्र्यांनी बैठक घेण्याची मागणीही केली होती. परंतु यावर सत्ताधाऱ्यांनी ब्र शब्दही काढला नाही. या मुद्याला धरून राजकारण होत असले तरी वास्तवही आहे. याचा फटका सामान्य जनतेला बसत आहे.

अंबाजोगाईत फोटो काढण्यावरून दारुड्या गुंडाप्रवृत्तीच्या लोकांकडून आमदार नमिता मुंदडा रसवंतीवर असतांना धमकी देण्यात आली होती. त्याचबरोबर पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या परळी शहरालगत तीन दिवसात तीन खून झाले. सावकारांनी उच्छाद मांडला आहे. अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांचा धुडगूस सुरू आहे. वाळू माफियांकडून तहसीलदारांना घरी जाऊन धमकी दिली जात आहे. यासह चोरीच्या घटना देखील मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.

त्यामुळे बीड जिल्ह्यातील नागरिक एक ना अनेक समस्यांनी त्रस्त झाल्याने, आमदार नमिता मुंदडा, आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासह इतरांनी बीड जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेवर ताशेरे ओढत, पोलीस अधीक्षकांविरोधात तक्रारी केल्या आहेत. याच प्रकरणाची आता गंभीर दखल घेत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी, या प्रकरणाची चौकशी करू, असं आश्वासन देत पोलीस अधीक्षक आर. राजास्वामी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याची जाहीर घोषणा केली आहे.

कोण आहेत पोलीस अधीक्षक राजा रामास्वामी.

—————————————————

आंध्रप्रदेश येथील तामिळनाडूतील शेतकरी कुटुंबात जन्माला आलेले पोलीस अधीक्षक राजा रामास्वामी हे,इलेक्ट्रिक इंजिनिअर आहेत.देशातील सर्वाधिक मोठा उद्योग समूह असलेल्या विप्रो कंपनी मध्ये त्यांनी सुमारे चार वर्षे नोकरी केली आहे.यापैकी काही काळ त्यांनी अमेरिकेमध्ये वास्तव्य केले आहे.यूपीएससी मधून सन 2012 साली ते 274 व्या रँक मधून आयपीएस अधिकारी म्हणून सिलेक्शन झाले.सुरुवातीला प्रशिक्षणार्थी पोलिस अधीक्षक म्हणून हैदराबाद येते एक वर्षे काम केले आहे.अमरावती,अहमदनगर,गडचिरोली उस्मानाबाद राज्य गुप्तवार्ता विभाग मुंबई या ठिकाणी त्यांनी विशेष काम केले आहे.

गडचिरोली येथे अतिरिक्त पोलीस अधीक्षक पदावर ती कार्यरत असताना,पोलीस महासंचालक या पदकाने त्यांना विशेष सन्मानित करण्यात आले आहे.सध्या ते बीड जिल्हा येथे पोलीस अधीक्षक पदावर ती कार्यरत असून त्यांना विधिमंडळाच्या नुकत्याच सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मध्ये गृह मंत्री नामदार दिलीप वळसे पाटील यांनी सक्तीच्या रजेवर पाठविले आहे.

दृष्टीक्षेपात बीड जिल्हा!

——————————————–

देशाच्या राजकारणात बीड या जिल्ह्याचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते,ते तत्कालीन केंद्रीय मंत्री स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या मुळेच.महाराष्ट्राच्या युती सरकारच्या तत्कालीन काळात गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी कामकाज हाताळले आले होते.भारतीय जनता पार्टी मधून केंद्रीय स्तरावर ती ओबीसी चेहरा म्हणून त्यांच्याकडे बघितले जात होते.ऊसतोड मजुरांचे प्रामुख्याने नेतृत्व करणारे प्रतिनिधित्व म्हणून त्यांची संपूर्ण महाराष्ट्रभर ओळख होती.

बीड जिल्हा भारत देशातील महाराष्ट्र राज्याच्या ३६ जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. हा जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या जवळजवळ मध्यभागी आहे. जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या मराठवाडा विभागात मोडतो. जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र बीड हे आहे. बीड हा महाराष्ट्रातील ऊसतोड़ कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. बालाघाट डोंगर रांगांपासून तयार झालेला जिल्ह्याचा काही भाग दुर्गम अणि डोंगराळ आहे. बीड हा तुलनेने मागासलेला जिल्हा आहे. जिल्ह्यात मराठी व्यतिरिक्त हिंदी, उर्दू, तेलुगू या भाषादेखील बोलल्या जातात.बीड जिल्ह्यातील माजलगाव हा एक सधन तालुका आहे.

बीड जिल्ह्याच्या प्राचीन इतिहासाविषयी पुराणांमधून उल्लेख येतो असे सांगतात.

बीड हा महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. हा जिल्हा सहकारी चळवळींसाठीही ओळखला जातो. महाराष्ट्र राज्यातील अनेक साखर कारखान्यांवर ऊसतोडीसाठी बहुधा बीडचा कामगार असतो. बालाघाट डोंगर रांगांपासून तयार झालेला जिल्ह्याचा काही भाग दुर्गम अणि डोंगराळ आहे. बीड जिल्ह्याची दुष्काळी भाग म्हणून ओळख आहे. बीड हा तुलनेने मागासलेला जिल्हा आहे. जिल्ह्यात मराठी व्यतिरिक्त हिंदी, तेलुगू, उर्दू या भाषादेखील बोलल्या जातात. बीड हे मराठवाड्यातील एक ऐतिहासिक शहर आहे. मराठीतील आद्य कवी मुकुंदराज आणि बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले परळी वैजनाथ हे बीड जिल्ह्यात आहे. बीड शहरातून बिंदुसरा नदी वाहते. मुर्तुजा शाह निजामच्या काळात बांधली गेलेली बीडची खजाना विहीर (खजाना बावड़ी) प्रसिद्ध आहे जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अतिशय कमी आहे. माजलगाव येथें सिंदफणा नदी असून तिच्यावर धरण बांधलेले आहे. गंगामासला येथें मोरेश्वर गणपती मंदिर आहे. तेलगावं येथें सुदेर्रावजी सोळके साखर कारखना आहे. माजलगाव येथें एक फार जुने महादेवाचे मंदिर आहे. बीड हे सिताफळासाठी प्रसीद्ध आहे.

महाराष्ट्रातील सर्वात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या या जिल्ह्यात झाल्याचे सांगितले जाते.

बीड जिल्ह्यात छोटेवाडी नावचे एक छोटे गावं आहे.

बीड जिल्ह्याच्या चतुःसीमा संपादन करा

पूर्वेला : परभणी

पश्चिमेला : अहमदनगर

उत्तरेला : जालना आणि औरंगाबाद

दक्षिणेला : लातूर आणि उस्मानाबाद

प्रशासकीय विभाग संपादन करा

बीड जिल्ह्याचे विभाजन २ उपविभागांमध्ये

करण्यात आले आहे.

त्यांचे विभाग पुढीलप्रमाणे आहेत.

बीड उपविभाग

अंबेजोगाई उपविभाग

या उपविभागांचे विभाजन ११ तालुकामध्ये पुढीलप्रमाणे करण्यात आले आहे.

बीड ,किल्ले धारूर,अंबेजोगाई,परळी-वैद्यनाथ,केज,आष्टी

गेवराई,माजलगाव,पाटोदा,शिरूर,वडवणी

शिरूर व वडवणी या तालुक्यांची निर्मिती २६ जून १९९९ ला करण्यात आली.

जिल्ह्यात ६० जिल्हा परिषद मतदारसंघ असून ११ पंचायत समित्या आहेत. एकूण गावे १३४६ तर १०१९ ग्रामपंचायती आहेत.

विद्युतीकरण झालेली ग्रामीण गावे : १३७

आयुक्तालय,औरंगाबाद विभाग

मुख्यालय,बीड

तालुके

बीड,किल्ले धारूर,अंबाजोगाई

परळी-वैद्यनाथ,केज,आष्टी,गेवराई,

माजलगाव,पाटोदा,शिरूर,वडवणी

क्षेत्रफळ

– एकूण

१०,६९३ चौरस किमी (४,१२९ चौ. मैल)

लोकसंख्या

-एकूण

२५,८५,९६२ (२०११)

-लोकसंख्या घनता

२४१ प्रति चौरस किमी (६२० /चौ. मैल)

-शहरी लोकसंख्या

४,५८,२२०

-साक्षरता दर

७३.५३%

-लिंग गुणोत्तर

१.०९ ♂/♀

प्रशासन

-लोकसभा मतदारसंघ

बीड (लोकसभा मतदारसंघ)

-विधानसभा मतदारसंघ

बीड विधानसभा मतदारसंघ

केज विधानसभा मतदारसंघ

आष्टी विधानसभा मतदारसंघ

गेवराई विधानसभा मतदारसंघ

परळी विधानसभा मतदारसंघ

माजलगाव विधानसभा मतदारसंघ

-खासदार

प्रितम गाेपीनाथ मुंडे.

Updated : 8 March 2022 12:16 PM GMT

Shubham Gote

Mr. Shubham Gote is involved in the day-to-day operations of the company along with the business expansion strategies of the print media division of the group. He also supervises the performance of the company in terms of the business plans. He has been on the Board of the Company since November 2009.

Leave a Reply

Your email address will not be published.