‘बिटकॉइन’मध्ये मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून 20 लाखांची फसवणूक; तिघांवर गुन्हा दाखल

‘बिटकॉइन’मध्ये मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून 20 लाखांची फसवणूक; तिघांवर गुन्हा दाखल

कोल्हापूर- मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करायला लावून केदार रानडेसह अन्य दोघांनी 20 लाखाची फसवणूक केली आहे. याप्रकरणी सुहास नागनावार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजरामपुरी पोलीस ठाण्यात केदार रानडेसह अन्य दोघा विरोधात फसवणुकीचा गुन्हा करण्यात आला आहे.

टाकाळा परिसरात राहणाऱ्या केदार रानडे यांचे केदार कन्सल्टन्सी या नावाचे ताराबाई पार्क परिसरात कार्यालय आहे. रानडे याने वृत्तपत्रात जाहिरात देऊन मोठ्या परताव्याचे आमिष दाखवत लोकांना बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करण्याचे आवाहन केले होते. 2017 मध्ये वर्तमानपत्रातील फसव्या जाहिरातीला भुलून याचं परिसरात राहणाऱ्या सुहास नागन्नावार यांनी रानडे याच्याकडे बिटकॉइनच्या माध्यमातून गुंतवणूक करायला सुरुवात केली.

जुलै 2017 ते ऑक्टोबर 2017 या दरम्यान नागन्नावार यांनी जवळपास 20 लाख इतक्या रकमेची बिटकॉइनमध्ये गुंतवणूक केली होती. मात्र, 3 वर्षात कोणत्याही प्रकारचा परतावा न मिळाल्याने नागन्नावर यांनी केदार कन्सल्टन्सीचे केदार रानडे यांच्यासह दोघांविरोधात राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान केदार रानडे या संशयिताला यापूर्वी शाहूपुरी पोलिसानी फसवणूक प्रकरणी ताब्यात घेतले होते. आता पुन्हा केदार रानडे आणि अन्य दोघा विरोधात राजारामपुरी पोलिसात गुन्हा दाखल झाल्याने रानडे याच्या कारनाम्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता असून पोलीस त्याचे गोव्यातील साथीदार अजय दौडमनी सुकांता भौतिक या दोघांचा शोध घेत आहेत.


Shubham Gote

Mr. Shubham Gote is involved in the day-to-day operations of the company along with the business expansion strategies of the print media division of the group. He also supervises the performance of the company in terms of the business plans. He has been on the Board of the Company since November 2009.

Leave a Reply

Your email address will not be published.