बाळासाहेबांच्या जयंती निमित्त युवासेनेच्या वतीने फळ वाटप

वणी :-निलेश भोयर
शिवसेना व युवासेनेच्या वतीने बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त फळं वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने युवासेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. युवासेनेच्या वतीने आयोजित या जयंती सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना शहर प्रमुख राजू तुराणकर व माजी उपजिल्हा प्रमुख दीपक कोकास हे उपस्थित होते. उपस्थित सर्व शिवसैनिकांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला हारार्पण करून त्यांना अभिवादन केले.
शिवसेनेचे निष्ठावान कार्यकर्ते असलेले अजिंक्य शेंडे यांची युवासेनेच्या उपजिल्हा प्रमुख पदी निवड करण्यात आली. उपजिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी यशस्वीरीत्या पार पडतांना अजिंक्य शेंडे यांनी आज बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी केली. यावेळी रुग्ण व निराधार वृद्धांना फळे वाटप केलण्यात आले. बाजीराव महाराज वृद्धाश्रमातील वृद्धांना फळांचे वाटप करून त्यांच्या वास्तववादी जीवना विषयी हितगुज करतांनाच काही क्षण त्यांच्या सहवासात घालवून त्यांच्या निराधारतेला शब्दांनी बळ देत त्यांचे नैराश्य दूर करून त्यांच्यात उत्साह भरण्याचा अजिंक्य शेंडे यांनी प्रयत्न केला. कार्यक्रमाला राजू तुराणकर, नामदेव शेलवाडे, दीपक कोकास, महेश पहापडे, राजू पारोडे, मिलिंद बावणे, स्वप्नील ताजने, ध्रुव येरणे, उमेश चेडे, सोमेश्वर गेडेकर, पवन सोनू फाये, सौरभ धानोरकर, अवि राजूरकर, अजय शिवणी, मयूर क्षीरसागर, श्रीकांत सुशोणकर, गोलू सिडाम, संकेत कार्लेकर, संजय कवाडे, प्रितम मत्ते, योगेश मजगवळी, सौरभ चिंचोळकर, चेतन काकडे, अभि नागपुरे, तुळशीराम काकडे, अनिकेत भेंटाले, साकेत भुजबळराव, अविनाश शिवंतीवार, आकाश गोडे, हर्षल बिडकर, गोलू हंसकार, युवराज ताजने, नीरज चौधरी आदी शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.