फुकटची बिर्याणी आणि पुलिस वाली बाई.

—————————————————-
लेखक श्री तानाजी सखाराम कांबळे
रविवार विशेष 1-8-2021
————————————————–
आमच्या गावाकडं आमच्या चुलतआज्याचं
नाव भाऊमा कांबळे.मी नुकताच चौथीची शिष्यवृत्ती परीक्षा पास झालो होतो तालुका ठिकाणी.आमच्या घरासमोर खूप जुना समाज मंदिर आहे.त्याला तक्क्या असं म्हणतात. दारात मी खेळत असताना भाऊमान मला हाक मारली.गावातल्या दुकानातून बिडी बंडल आणण्यासाठी भाऊमान माझ्या हातावर चार आण ठेवले आणि मी दुकानातून बंडल आणून दिल.आता वय झालं होतं भाऊमाच.बिडी चा एक झुरका मारत मारत भाऊ मान मला एक प्रश्न विचारला बाळा तुझं कितवी शाळेच यत झाली.
मी म्हणालो चौथी पास झालो.
अजून चार यत शिक बाळा असं म्हणून भाऊ मान आपला मोर्चा घरातल्या खाटेवर ती वळवला.भाऊमाचेआशीर्वादाने कशीबशी चार येताची तीन येत तर शिकलो. बारावीला पहिल्या टर्मला नापास होऊन पुन्हा पास झालो.
पुढे लॉ कॉलेजला कशीबशी दोन वर्षे काढली. अर्धा वकील होऊन बाहेर पडलो ते कायमचा.
मात्र भाऊ मान सांगितलेले येताच गणित आज मात्र डोळ्यासमोर तरंगू लागले.असे अनेक यत झालेली विद्वान मंडळी आज प्रशासनामध्ये अधिकारी म्हणून काम करत आहेत विविध ठिकाणी.शाळेच्या यत्ताच गणित सोडवत सोडवत चार पुस्तके वाचायचीत,स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून प्रशासनामध्ये अधिकारी म्हणून जायचं, खुर्चीची हवा एकदा का डोक्यात बसली की, सगळ्या जनतेला गुलाम समजून वागणूक करायचे.खुर्ची ची मस्ती अंगात शिरल की भूत संचारलागत
मग अशी माणसं वेड्यासारखी आपली वर्तणूक करतात. तळागाळातील सामाजिक व्यवस्थेचा अभ्यास करायचा नाही सामाजिक व्यवस्थेतील दैनंदिनी समजून घ्यायची नाही, शेती ,शेतकरी अर्थव्यवस्था ,आणि व्यापार आणि उद्दीम यांच्याविषयी कोणत्याही प्रकारचा अभ्यास करायचा नाही नैसर्गिक रित्या येणारे ऋतूप्रमाणे संकटे आणि त्यातून ढासळत चालणारी सामाजिक व्यवस्था या व्यवस्थेमधील अनेकांच्या वरती त्याचे होणारे वाईट परिणाम समजून घ्यायचे नाहीत.नुसती चार यतं ज्यादा शिकले म्हणून घमेंडीत राहायचं.
प्रशासनामध्ये असे काही अस्तनीतले निखारे आज देखील आहेत.महाराष्ट्राच्या पोलीस दलाची अब्रूची लक्तरे वेशीवर टांगलेली असताना शंभर कोटीचा वसुली साठी, एकाबाजूला अगोदरच वर्दी डागाळलेली आहे.या वसुली पाई काहीजण जेलमध्ये आहेत,तर अनेक जण जेलच्या वाटेवरती आहेत.
एवढे गंभीर प्रकरण असताना पुणे पोलीस मुख्यालय अंतर्गत उपायुक्त दर्जाच्या एका बाईसाहेबांनी आपल्या स्टाफ मधील एका कर्मचाऱ्याला आपल्या हद्दीतील पी आय ला सांगून बिर्याणी फुकट आण आणि ती तुपातली तळलेली बिर्याणी फुकट खाण्याची हाऊस आज चांगलीच नडली आहे.
राज्याचे गृहमंत्री नामदार दिलीप वळसे पाटील यांनी या फुकटच्या बिर्याणी खाण्याच्या एकूणच प्रकरणाची चौकशी करण्याचे गृह विभागाला मंत्रालयात आदेश दिले आहेत.
भाऊमा चे सांगण्यानुसार अशी जास्तीची चार यतं शिकलेली दैनंदिनी जगताना मेंदू घाणवट ठेवून जगतात काय हाच मोठा प्रश्न आहे.या बाईसाहेब एवढ्यावरच थांबले नाहीत तर चक्क आपल्या हद्दीत दुकान आहे तेथील
पी आय ला सांगा असा सज्जड दम भरला. बाईंन हद्दीची वाटणी सुद्धा करून ठेवली आहे. महिन्याच्या वसुलीचा आकडा तेवढ्यात बाहेर फुटला असता तर खूपच बर झाल असत. निदान निदान माजी गृहमंत्री अनिल देशमुख डॉक्टर परमवीर सिंह यांची प्रसिद्धीची क्रेझ पुणे पोलीस मुख्यालयाकडे वळली असती.
तुपात तळलेली फुकटची बिर्याणी खाण्याचा झालेला मोह या बाईसाहेबांना आवरता न आल्याने त्यांच्या तोंडातून निघालेला हद्दीत ला वाटून घेतलेला येरीया या वाक्यातून संशयाची किनार मात्र नक्कीच दिसून येते.
सुमारे काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे.रविवारचा दैनिक सामना हा पेपर चाळत असताना पुणे पोलिस मुख्यालयातील विविध कारणांवरती एक स्टोरी पत्रकार श्री पवार नावाचे पत्रकार बंधूंनी छापली होती. तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक पुणे अतिरिक्त पोलिस अधीक्षक महिला तत्कालीन पुणे यांच्यात प्रेमाचा त्रिकोण असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू होती.
हळूहळू याची वार्ता तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक पुणे यांच्या पत्नीला समजल्यावर ती, धडक जिल्हा पोलीस अधीक्षक पुणे यांच्या पत्नीने मुख्यालयात येऊन,आपल्या पती देवांचे वरती प्रेमाचा त्रिकोण अतिरिक्त ठरलेल्या,
त्या अतिरिक्त पोलिस अधीक्षक महिला बाई साहेबांना,कानफाट लाल होईपर्यंत मारत होती.
एसपी साहेब गप गुमान बघत होते पोलीस आवाक झाले होते.
या प्रेमाच्या त्रिकोणाची सांगता डायरीवर न येताच परस्पर मिटवली गेली.संदर्भ दैनिक सामना लेखक श्री.पवार.
कोल्हापूरला वस्त्र नगरी म्हणून ओळख असणाऱ्या पोलीस मुख्यालय अंतर्गत अतिरिक्त पदावर असणाऱ्या एका महिला अधिकारी यांनी निरीक्षक दर्जाच्या उपनिरीक्षक दर्जाच्या फौजदारास मानसिक छळ करून आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंद राजारामपुरी पोलीस स्टेशन येथे आहे.
मात्र फिर्यादीने एका वरिष्ठ महिला अधिकारी यांनी नाव न घेता अशा पद्धतीची रितसर एफआयआर दाखल केलेले आहे. संबंधित प्रकरणाची चौकशी जिल्हा पोलिस प्रमुख
श्री.बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली आजतागायत सुरू आहे.
अशा अनेक प्रवृत्ती या भाऊमान सांगितलेल्या चार यत् जास्तीच शिकलेल्या पैकीच असतात.खरतर महाराष्ट्रातील शहरी उपनगर आणि ग्रामीण भागात पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकारी व कॉन्स्टेबल ठाणे अंमलदार त्यांचा गोपनीय विभाग,बारनिशी, बीट अंमलदार,सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक, हा राबणारा घटक आहे.
उन्हातानात पावसापाण्यात मेलेली मढी आणि मानवी गुर ढोर सांभाळण्यात पोलीस शिपायांची सेवानिवृत्ती कधी संपून
जाते हे देखील त्याला कळत नाही.
ना बायकापोरांची काळजी ना गावाकडच्या शेत वाडीवरची काळजी,ना आई-वडिलांची काळजी.ना कधी वेळेस जेवण जेवायला मिळत नाही तर बंदोबस्त ज्यावेळी असतो त्या ठिकाणी वेळ प्रसंगी पाल मारून राहण्याची पाळी अशा पोलीस दलातील पोलिसांचे वरती येते.आणि हे भयानक वास्तव असून वस्तुस्थिती नाकारता येत नाही.
2014ला फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचे विधिमंडळाचे नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये आम्हा पत्रकारांची सोय सुयोग भवणा केली होती.नक्षलाईज एरिया इथे असल्यामुळे आम्हाला तब्बल 54 पोलिसांचा फौजफाटा सुरक्षितेसाठी बाहेर ठेवला होता.
एक उपअधीक्षक दर्जाच्या अधिकारी त्यांची चीप प्रमोटर होते. धो-धो पडणाऱ्या पावसात देखील तूसभर पोलीस हलत नव्हते.डासांन भरलेल्या त्या ठिकाणी येथील पोलीस प्रामाणिकपणे आपली सेवा बजावत होते.
मी नेहमी विधान भवन ला जाताना त्यांची कसून चौकशी करून जायचं.
आम्हाला विधान भवनला न्यायला मंत्रालयातून गाडीची व्यवस्था केली असल्याने दैनंदिनी जाताना-येताना मी खूप निरीक्षण त्या वेळच्या येतील बंदोबस्ताच्या चौकशीची नोंदवली होती. तळागाळातील सामाजिक व्यवस्थेला बरोबर घेऊन काम करणारी असे निरीक्षक उपनिरीक्षक सहायक निरीक्षक दर्जाच्या पोलिस अधिकारी व त्यांचा पोलीस कर्मचारी यांचा स्टाफ खरोखर प्रामाणिकपणे सेवा बजावत असतो.
खरंतर या खालच्या फळी मुळेच महाराष्ट्र पोलीस अभिमानाने सन्मानच पात्र ठरत आहे.
मात्र,आमच्या भाऊमाच्या भाषेत चार यत जास्तीची शिकलेली अशी अशी प्रशासनातील नालायक अवलादी ज्यांना फुकटचे खायची सवय लागलेली असते,अधिकारी पदाचा रुबाब झाडायची सवय लागलेली असते,
कनिष्ठ अधिकारी कर्मचारी यांना मानसिक त्रास देण्याची सवय लागलेली असते.अशाअनेकांना खरंतर वाड्या वस्तीवर ती पळवायला पाहिजेत. मग तळागाळात काम करत असताना काय सुख दुःख निर्माण होतात याची जाणीव होईल.
सरकारने बांधलेल्या सरकारी खर्चात भव्य अशा प्रशासकीय इमारतीमधील एसी केबिनमध्ये बसून,महिन्याला गलेलठ्ठ पगार देखील असून आपल्या हद्दीत दुकानदाराकडून फुकटची बिर्याणी खाणाऱ्या असल्या पोलीस उपायुक्त दर्जाच्याअधिकारी बाई साहेबांचा आदर्श काय तो घ्यावा,
केवळ चार “यत” जास्तीच्या शिकल्या म्हणून
आमच्या भाऊमा कांबळे च्या भाषेत!
———————————————————-