पोपटाला दिले जीवदान

पोपटाला दिले जीवदान

पोपटाला दिले जीवदान

यवतमाळ, अंजनिय सोसायटी मधील जागरूक नागरिक दुशांत कांबळे यांनी MH29 हेलपिंग हँड च्या हेल्पलाईन नंबर 9850577616 वर एक कॉल आला की आमच्या शेड मध्ये एक जखमी पोपट असल्याची माहीती टीमचे संस्थापक व अध्यक्ष निलेश मेश्राम याना देण्यात आली ,कोणताही विलंब न करता हेलपिंग हँड टीम चे प्राणीमित्र ओम ठाकरे, मोंटू तेलगोटे,शिवम बगमारे जीवन तडसें यांना घेऊन अथक परिश्रम करून जखमी पोपट पक्षाला व्यवस्थित पकडून तेथील नागरिकांना सांगितले की तुमच्या जागरूक पणा मुळे आम्ही या पक्षाचे जीव वाचवू शकलो.

वन्यजीव कायद्यानुसार पोपट किंवा अन्य कोणताही पक्षी बंदिस्त करून ठेवणे, हा गंभीर गुन्हा आहे.असे सांगून, त्यानंतर वनविभागात नोंद करून, यवतमाळ येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात डॉ. बी.व्ही. चव्हाण आणि डॉ.तृप्ती शर्मा यांनी त्यावर उपचार केले, आणि वनविभागाच्या परवानगीने पोपटाच्या प्रकृतीत सुधार होई पर्यत टीमने त्याची जबाबदारी स्वीकारली. आणि लवकरच पोपटाला बरे करून पर्यावरणात निसर्गमुक्त करण्यात येईल अशे सांगितले.

Updated : 7 April 2022 6:03 AM GMT

Shubham Gote

Mr. Shubham Gote is involved in the day-to-day operations of the company along with the business expansion strategies of the print media division of the group. He also supervises the performance of the company in terms of the business plans. He has been on the Board of the Company since November 2009.

Leave a Reply

Your email address will not be published.