पैसे द्या- बूस्टर घ्या: उद्यापासून १८+ चे लोक बूस्टर घेऊ शकतील‼️

MMarathi ❗ Positive news
१८ वर्षांवरील सर्व नागरिक १० एप्रिलपासून खासगी लसीकरण केंद्रांवर कोविड लसीचा बूस्टर डोस घेऊ शकतील. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी ही घोषणा केली.
ज्यांना दुसरा डोस घेऊन नऊ महिन्यांपेक्षा जास्त काळ झाला आहे, असे नागरिक प्रिकॉशन किंवा बूस्टर डोससाठी पात्र असतील. तथापि, त्यासाठी त्यांना पैसे द्यावे लागतील.
एक्सई व्हेरिएंटमुळे कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्यता असताना केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. बूस्टर डोस अनिवार्य नाही. तिसरा डोस घ्यायचा की नाही हे लोकांच्या इच्छेवर अवलंबून आहे.
Updated : 9 April 2022 9:17 AM GMT