पेपर फुटल्यासंदर्भातील वृत्त चुकीचे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून स्पष्ट

पेपर फुटल्यासंदर्भातील वृत्त चुकीचे,  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून स्पष्ट

पुणे – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवारी घेण्यात आलेली राज्य सेवा पूर्व परीक्षा सुरळीत पार पडली. या परीक्षेचा पेपर फुटल्यासंदर्भात प्रसिद्ध झालेली वृत्त चुकीची असून, अशी कोणतेही घटना घडली नसल्याचे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

करोनामुळे गेल्या दोन वर्षात एमपीएससीच्या परीक्षा होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे वयमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वर्ष परीक्षेला बसण्याची संधी देण्यात आली. त्यासाठी या उमेदवारांना अर्ज करण्यास वेळ वाढवून देण्यात आली. त्यामुळे नियोजित वेळेप्रमाणे दि. 2 जानेवारीला होणारी ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर एमपीएससीने ही परीक्षा 23 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आली. ही परीक्षा राज्यभरात सुरळीतपणे पार पडली असल्याचे एमपीएससीने ट्‌विट करीत स्पष्ट केले आहे.

राज्यात एकूण 724 परीक्षा उपकेंद्रावर परीक्षा झाली. यासाठी 2 लाख 52 हजार 395 उमेदवारांनी अर्ज केले होते. दरम्यान, राज्य सेवा पूर्व परीक्षा 2021 चा पेपर फुटल्यासंदर्भात काही समाजमाध्यमांमध्ये बातमी प्रसिद्ध होत आहे. हे वृत्त चुकीचे असून, असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे आयोगाने म्हटले आहे.


Shubham Gote

Mr. Shubham Gote is involved in the day-to-day operations of the company along with the business expansion strategies of the print media division of the group. He also supervises the performance of the company in terms of the business plans. He has been on the Board of the Company since November 2009.

Leave a Reply

Your email address will not be published.