पेट्रोल, डिझेल, गॅस, खाद्यतेल दरवाढीमुळे केंद्र सरकारचे अभिनंदन

पेट्रोल, डिझेल, गॅस, खाद्यतेल दरवाढीमुळे केंद्र सरकारचे अभिनंदन

पेट्रोल, डिझेल, गॅस, खाद्यतेल दरवाढीमुळे केंद्र सरकारचे अभिनंदन

पाटणी चौकात युवासेनेचे थाळी बजाव आंदोलन

सिलेंंडरला हार घालुन फटाके फोडले

जिल्हाभरात युवासेनेचेे आंदोलन

फुलचंद भगत

वाशिम – पेट्रोल, डिझेल, गॅस, खाद्यतेल, डाळी अशा सर्वच गोष्टीचे दर दररोज वाढत आहेत. सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील झाले आहे. इंधन दरवाढ करुन महागाई वाढवून सर्वसामान्य जनतेच्या कष्टाच्या कमाईवर दरोडा घालणार्‍या केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार राहीलेला नाही. म्हणून वाढत्या महागाईबद्दल केंद्र सरकारचे अभिनंदन करण्यासाठी युवासेनाप्रमुख ना. आदित्य ठाकरे, युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या आदेशाने आणि खासदार भावनाताई गवळी यांच्या नेतृत्वात व युवासेना जिल्हाप्रमुख रवि भांदुर्गे यांच्या मार्गदर्शनात ३ एप्रिल रोजी स्थानिक पाटणी चौेकात युवासेना जिल्हयाच्या वतीने थाळी व ताली बजाव आंदोलन करण्यात आले. तसेच युवासेना शहरप्रमुख गजानन ठेंगडे यांनी सिलेंडरला हार घालुन फटाके फोडले. यावेळी शिवसैनिक व युवासैनिकांनी केंद्रातील सरकारच्या विरोधात ‘देशका युवा बेरोजगार, मोदी सरकार मोदी सरकार’, महंगाई की हाहाकार, मोदी सरकार मोदी सरकार’ अशा घोषणाबाजी करुन परिसर दणाणून टाकला. जिल्हयातील रिसोड, मालेगाव, कारंजा, मंगरुळपीर, मानोरा व वाशिम अशा सहाही तालुक्यात युवासेनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनाला शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख सौ. मंगलाताई सरनाईक, शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेश मापारी, बाळु देशमुख, तालुकाप्रमुख रामदास मते पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख महादेव सावके, महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख वनिता अलाटे, तालुकाप्रमुख ज्योती खोडे, शहरप्रमुख सुनिता गव्हाणकर, युवती उपजिल्हाप्रमुख प्रिती जाधव, युवती जिल्हा समन्वयक शितल गर्जे, उपशहरप्रमुख शारदा कच्छवे, शाखाप्रमुख जयश्री इंगोले, शहरप्रमुख गजानन भांदुर्गे, शिवसेना उपशहरप्रमुख राजाभैय्या पवार, उपशहरप्रमुख युवराज शांकट, नामदेवराव हजारे, आकाश कांबळे, विजय खानझोडे, गोपाल लव्हाळे, गणेश पवार, मोहन देशमुख, राजु भांदुर्गे, महादेव हरकळ, शाम खरात, सुरेश इंगळे, बबन वाघमारे, बाजु जैरव, नितीन मडके, उमेश मोहळे, राजु डोंगरदिवे, युवासेना शहरसचिव रोहित वनजाणी, विभागप्रमुख मनोज खडसे, संतोष गवळी, शाखा प्रमुख रवि खडसे, उपतालुकाप्रमुख देवा बरडे, शाखा उपप्रमुख शिवम खडसे, सचिव अर्जुन खडसे, विठ्ठल महाले, विजय शेळके, सतिश खंडारे, राजु धोंगडे, शाहीर डाखोरे, ज्ञानेश्वर धामणे, गणेश गाभणे, पांडूरंग पांढरे, दिलीप शिंदे, बालु माल, अतुल वाटाणे, ज्ञानेश्वर दांदळे, अर्जुन वैरागडे, रवि खोटे, ज्ञानेश्वर गोरे, अजय रणखांब, आरिफ पठाण, दिपक ठेंगडे, सागर जाधव, दिलीप रणखांब, गणेश उकळे, विशाल आवारे, मनु रणबावळे, रामा बांगर, शिवा गवळी, सौरभ भोंगळे, प्रतिक कोरडे, राम बोरा, अंबादास जोगदंड, महादेव कांबळे, रवि अंभोरे, बंटी शिरसाट, एकनाथ इंगोले, संदीप निंबोळे, बबलु नवघरे, अशोक शिराळ, संतोष इंगोले, विनोद घुगे, मनोज तायडे, सागर भालेराव, आकाश पवार, स्वप्नील इंगोले, शिवाजी कव्हर, राजु साबळे, उमेश गायकवाड, सुशिल भिमजीयाणी, शिवहर डोेंगरदिवे, सांबा शिवलकर, शुभम पवार, गोपाल इरतकर, सुंदर डोंगरदिवे, निखिल खंडारे, पवन जिवनाणी, विजय रामवाणी, सोनु ज्युरियाणी, मुकेश रत्नाणी, सोनु पारवाणी आदी शिवसेना, युवासेना पदाधिकारी व कार्यकर्ते, महिला आघाडी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Updated : 3 April 2022 6:41 PM GMT

Shubham Gote

Mr. Shubham Gote is involved in the day-to-day operations of the company along with the business expansion strategies of the print media division of the group. He also supervises the performance of the company in terms of the business plans. He has been on the Board of the Company since November 2009.

Leave a Reply

Your email address will not be published.