पुसद येथे ई- श्रमकार्ड मोफत नोंदणी शिबीर संपन्न

पुसद येथे ई- श्रमकार्ड मोफत नोंदणी शिबीर संपन्न
_____________________
आ.निलय नाईक यांच्या मार्गदर्शनात शिबिर संपन्न
_____________________
भाजपाचे शहराध्यक्ष, दीपक परिहार, रूपाली ताई जयस्वाल ओम प्रकाश शिंदे यांचे मुख्य आयोजन!
_____________________
पुसद प्रतिनिधी
22 जानेवारी 20 22 रोजी पुसद येथील संभाजीनगर राणी लक्ष्मीबाई विद्यालय येथे केंद्र सरकारच्या श्रम मंत्रालय मार्फत श्रमिक कामगार यांच्यासाठी ऑनलाइन डिजिटल इ श्रम,कार्ड चे मोफत नोंदणी शिबिराचे आयोजन भारतीय जनता पक्षाच्या, शाखा पुसद शहराच्या वतीने , घेण्यात आले होते यासाठी आमदार निलय नाईक तसेच शहराध्यक्ष दीपक सिंह परिहार व रूपालीताई जयस्वाल यांच्या वतीने जास्तीत जास्त नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले होते त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत या शिबिरात एकूण 180 लोकांचे नोंदणी झाली होती आणि यापैकी 100जणांचे कार्ड तयार करून देण्यात आले
श्रमिक कामगार
केंद्र सरकारने असंघटित क्षेत्रातील कोट्यावधी श्रमिकांचा डेटाबेस तयार करण्यासाठी ई – श्रम पोर्टल सुरू केले आहे. आतापर्यंत मोठ्या संख्येने श्रमिकांनी ई-श्रम पोर्टलवर वर रजिस्ट्रेशन केले आहे. हा श्रमिकांचा एक राष्ट्रीय डेटाबेस आहे. ई-श्रम पोर्टलचे लक्ष 38 कोटीहून अधिक श्रमिकांना जोडणे आहे. या लोकांना ई-श्रम कार्ड देण्यात येईल. असंघटित क्षेत्रात काम करणारे मजूर ई-श्रम पोर्टलवर कार्डसाठी अर्ज करू शकतात. सध्या केंद्र सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाने ई-श्रम पोर्टलवर रजिस्ट्रेशनच्या अंतिम तारखेबाबत कोणत्याही सूचना दिलेल्या नाही. त्यामुळे श्रमिकसुद्धा कोणत्याही अडचणींशिवाय आपले ई-श्रम कार्ड बनवू शकतील.
अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
फक्त आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक आणि बँक खाते क्रमांक आवश्यक आहे.
– कामगार विभागाच्या सर्व योजनांचा लाभ मिळू शकतो
प्रत्येक कामगार ई-श्रम कार्ड बनवता येते जसे, घरकाम करणारी – मोलकरीण (काम वाली बाई), स्वयंपाक बाई (स्वयंपाक), सफाई कर्मचारी, गार्ड, रिक्षाचालक,चहावाला, चौकशी कारकून, प्रत्येक दुकानातील नोकर/सेल्समन/मदतनीस, ऑटो ड्रायव्हर, ड्रायव्हर, पंक्चरर, ब्युटी वर्कर, मोची, शिंपी, सुतार, प्लंबर, इलेक्ट्रीशियन, पेंटर, टाइल कामगार, वेल्डर, फार्म कामगार, सर्व पशुपालक, पेपर हॉकर्स, झोमॅटो स्विगी डिलिव्हरी बॉईज, आशा वर्कर इत्यादी नागरिकांनी या योजना शिबिराचा लाभ घेतला.