पुणे जिल्ह्यात बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

खडकवासला – खामगाव मावळ (ता. हवेली) येथे खासदार सुप्रिया सुळे व महिला बाल कल्याण सभापती पुजा पारगे यांच्या प्रयत्नातून मोगरवाडी येथील मंदिरासमोरील कॉंक्रिटीकरण करणे, स्मशानभूमी बांधणे, खरमरी येथे सभा मंडप बांधणे, आणि गटार बंदिस्त गटार करणे अशा 28 लाख रुपयांच्या विकासकामाचे नुकतेच भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य नवनाथ पारगे, मालखेडचे सरपंच राजेंद्र जोरी, खामगाव मावळचे सरपंच सत्यवान नवघणे, माजी उपसरपंच प्रशांत दारवटकर, अविनाश मिंडे, अनिल उत्तेकर, अश्विनी नवघणे, स्मशानभूमी करिता बक्षीसपत्र करून दिलेले सुभाष दारवटकर, दशरथ दारवटकर, रामभाऊ जरांडे, अशोक दारवटकर, मावळा जवान संघटनेचे लक्ष्मण दारवटकर, सुर्वणा वालगुडे व ग्रामस्थ उपस्थित होते.
आंबेगाव पूर्व भागात शिवसेनाप्रमुखांना मानवंदना
लोणी धामणी -आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील धामणी, लोणी, खडकवाडी येथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची 96 वी जयंती साजरी करण्यात आली. धामणीत ग्रामपंचायतीसमोर पंचाच्या पारावर बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून नारळ फोडून पूजन करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सदस्य रवींद्र करंजखेले यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी शिवतीर्थ पतसंस्था अध्यक्ष ऍड. विठ्ठल जाधव, सरपंच सागर जाधव, युवासेना उपतालुका प्रमुख अक्षयराजे विधाटे यांनीही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना उजाळा दिला.
खडकवाडी येथे माजी सरपंच अनिल डोके, सरपंच कमल सुक्रे, उपसरपंच एकनाथ सुक्रे, माजी सरपंच शीला वाळुंज, गुलाब वाळुंज यांनी ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले धामणीत ज्येष्ठ शिवसैनिक पांडुरंग ससाणे, ग्रामपंचायत सदस्य दत्ता गवंडी, मिलिद जाधव, खंडू जाधव, काळुराम रोडे, रोहित भूमकर, विजय चिखले, शिवाजी जाधव, अमोल जाधव, सुधाकर जाधव, गणपत भंडारकर, सुनील जाधव, राजेश मादळे, विजय पंचरास, स्वप्निल बढेकर, योगेश विधाटे, मंगेश विधाटे, सुलेमान इनामदार, नबाब इनामदार, खुशाल जाधव, दिनेश जाधव, सतीश देशमुख, गणेश जाधव, चंद्रकांत जाधव,पोपट बढेकर उपस्थित होते.