पिंपळखुटा संगम येथे रविवारी महाप्रसाद पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी लाभ घेण्याचे आवाहन

पिंपळखुटा संगम येथे रविवारी महाप्रसाद

पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी लाभ घेण्याचे आवाहन

पिंपळखुटा संगम येथे रविवारी महाप्रसाद

पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी लाभ घेण्याचे आवाहन

फुलचंद भगत

वाशिम:-मंगरुळपीर तालुक्यातील पिंपळखुटा संगम येथे संत भायजी महाराज यांच्या १३१ व्या यात्रा उत्सवानिमीत्त रविवार १० एप्रिल रोजी भव्य शोभायात्रा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या महाप्रसादाचा लाभ पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी घ्यावा असे आवाहन संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.

तिर्थक्षेत्र पिंपळखुंटा संगम येथील संत भायजी महाराजांनी १३१ वर्षापुर्वी अडाण मडाण नद्यांच्या संगमावर रामनवमी निमीत्त यात्रा उत्सव सुरु केला आहे. दरवर्षी गुढीपाडवा ते हनुमान जयंती पर्यंत साजर्‍या होणार्‍या यात्रा महोत्सवात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते. मात्र, कोरोना संसर्गामुळे गेल्या दोन वर्षात हा यात्रा उत्सव साजरा होवू शकला नाही. यावर्षी कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यामुळे व प्रशासनाने कोरोनाचे सर्व निर्बंध हटविल्याने सदर यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये रविवार ३ एप्रील ते रविवार १० एप्रिल रोजी सकाळी ६ वाजे पर्यंत ‘राम कृष्ण विठ्ठल हरी नारायण’ नामाचा अखंड जयघोष करण्यात आला. रविवार १० एप्रिल रोजी सकाळी ६ वाजता काकड व मंदीर प्रदक्षिणा,सकाळी ८ वाजता मृती व समाधी पुजन, सकाळी ९ वाजता संत ज्ञानेश्वर महाराज भजनी मंडळ चांभई व आप्पास्वामी भजनी मंडळ शेंदुरजना अढाव यांचा गायनाचा कार्यक्रम, दुपारी १२ वाजता परमपुज्य पद्माकरजी तर्‍हाळकर यांच्या उपस्थितीत श्रीराम तर्‍हाळकर यांच्या सुमधुर वाणीतून श्रीराम जन्म कथा प्रवचन, त्यानंतर श्रीराम तर्‍हाळकर अकोला व नरेंद्र हेटे मुंबई, हभप प्रकाश महाराज यांच्या हस्ते श्रीराम, लक्ष्मण व सिता मूर्ती पुजन, दुपारी १ वाजता गोविंद महाराज प्रदक्षिणा व दहीहांडी कार्यक्रम होईल. आणि दुपारी ३ वाजतापासून हभप प्रकाश महाराज पिंपळखुटा, वैराग्यमूर्ती आकाशपुरी महाराज व हभप संजयनाथ महाराज जाधव अकोला यांच्या उपस्थितीत भव्य महाप्रसादाचे वितरण होणार आहे. तरी वरील कार्यक्रमाचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन संस्थान, भक्तगण, गावकरी मंडळी व यात्रा उत्सव समिती यांनी केले आहे.

रामलाडू व भाजीचा महाप्रसाद

ज्वारी व गव्हाच्या पिठापासून बनविलेले रामलाडू व सध्याच्या हंगामात उत्पादीत होणार्‍या पालेभाज्या आणि दाळीपासून बनवलेली भाजी, हे या महाप्रसादाचे खास वैशिष्ट्ये आहे. हा महाप्रसाद घेण्यासाठी पंचक्रोशीतील लाखो भाविक रामनवमीच्या दिवशी भायजी महाराज तिर्थक्षेत्र पिंपळखुटा संगम येथे आवर्जुन येत असतात.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम

मो.8459273206

Updated : 9 April 2022 7:28 AM GMT

Shubham Gote

Mr. Shubham Gote is involved in the day-to-day operations of the company along with the business expansion strategies of the print media division of the group. He also supervises the performance of the company in terms of the business plans. He has been on the Board of the Company since November 2009.

Leave a Reply

Your email address will not be published.