पालकमंत्री संदिपान भुमरे यांचा दौरा

पालकमंत्री संदिपान भुमरे यांचा दौरा

यवतमाळ दि. 24 (जिमाका) : पालकमंत्री संदिपान भुमरे हे दिनांक 25 व 26 जानेवारी रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

25 जानेवारी 2022 रोजी सकाळी 10 वाजता वेकोलि विश्रामगृह येथे आगमन व महाप्रबंधक वेकोलि वणी नाॅर्थ व वणी एरिया यांचे समवेत आढावा बैठक. 10.50 वा. उकणी कोळसाखाणी कडे प्रयाण.

11 वाजता उकणी कोळसाखाणीस भेट व पाहणी. दुपारी 12.30 वाजता शिंदोला ए.सी.सी. खाण भेट व पाहणी. 1 वा. वणीकडे प्रयाण. 1.30 वा. शासकीय विश्रामगृह वणी येथे आगमन व राखीव. 2.30 वा. वणी,मारेगाव व झरीजामणी तालुक्यातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व गटविकास अधिकारी ‌यांचेसमवेत आढावा बैठक. सायंकाळी 5 वाजता शासकीय विश्रामगृह यवतमाळ येथे आगमन. 5.30 वा.जिल्हाधिकारी, जिल्हा नियोजन अधिकारी व इतर अधिकारी यांचे समवेत आढावा बैठक. रात्री विश्रामगृह येथे मुक्काम.

26 जानेवारी रोजी सकाळी 9.10 वाजता विश्रामगृह येथून समता मैदान (पोस्टल ग्राउंड कडे) प्रयाण. ९.१५ वा. समता मैदान येथे प्रजासत्ताक दिन ध्वजारोहण कार्यक्रमाला उपस्थिती. १० वाजता वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कडे प्रयाण व तेथील जैविक कचरा व्यवस्थापन प्रकल्प, नव्याने उभारण्यात आलेल्या लिक्वीड मेडिकल ऑक्सिजन टॅंक, लहान बालक कोविड उपचार कक्षास भेट व पाहणी. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून खरेदी करण्यात आलेल्या बस रूग्णवाहिका व ई-रिक्षा चे लोकार्पण. १०.४५ वा. भूमी अभिलेख कार्यालयास खनिज निधीतून उपलब्ध करून देण्यात आलेल्या प्लाॅटर , रोव्हर, संगणक व इतर उपकरणांचे लोकार्पण. ११ वा. कोविड उपाययोजना संबंधी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक. ,14.45 वा. जलजीवन मिशन आढावा बैठक. 12.30 वाजता अपंग कल्याण निधी आढावा बैठक.दुपारी 1 वा. शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. 2 वा. पैठण कडे प्रयाण.

Updated : 24 Jan 2022 9:04 PM GMT

Shubham Gote

Mr. Shubham Gote is involved in the day-to-day operations of the company along with the business expansion strategies of the print media division of the group. He also supervises the performance of the company in terms of the business plans. He has been on the Board of the Company since November 2009.

Leave a Reply

Your email address will not be published.