पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा

पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा

चंद्रपूर, दि.10 मार्च : राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

शनिवार दि. 12 मार्च 2022 रोजी सकाळी 9 वाजता कमलाई निवास रामदासपेठ, नागपूर येथून जूनासुर्ला ता. मूलकडे प्रयाण. दुपारी 12 वाजता जूनासुर्ला ता. मूल येथे आगमन व विदर्भस्तरीय झाडीबोली साहित्य संमेलन कार्यक्रमास उपस्थित. दुपारी 1.15 वाजता जूनासुर्ला ता. मूल येथून पोंभुर्णाकडे प्रयाण. दुपारी 2 वाजता पोंभुर्णा येथे आगमन व इंडियन ऑइल पेट्रोलपंपचे उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 2.30 वाजता वन विश्रामगृह,पोंभूर्णा येथे तालुक्यातील पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा. दुपारी 3.30 वाजता पोंभूर्णा येथून मुलकडे प्रयाण. सायंकाळी 4.30 वाजता मुल येथे आगमन व दुर्गा मंदिर, मुल येथे चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्यावतीने जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित महिला बचतगट मेळाव्यास उपस्थित. सायंकाळी 5.30 वाजता दुर्गा मंदिर, मुल येथे मुल तालुका कमेटीद्वारा आयोजित शेतकरी मेळाव्यास उपस्थिती. सायंकाळी 7 वाजता शासकीय विश्रामगृह, मुल येथे आगमन व राखीव. सायंकाळी 7:30 वाजता मूल येथून नागपूरकडे प्रयाण.

Updated : 10 March 2022 4:51 PM GMT

Shubham Gote

Mr. Shubham Gote is involved in the day-to-day operations of the company along with the business expansion strategies of the print media division of the group. He also supervises the performance of the company in terms of the business plans. He has been on the Board of the Company since November 2009.

Leave a Reply

Your email address will not be published.