पायाचे ऑपरेशन झाले असता आराम न करता तलवाडा चे उपसरपंच करू लागले जनतेची सेवा.

गेवराई प्रतिनिधी देवराज कोळे
गेवराई तालुक्यातील तलवाडा
गावचे उपसरपंच आज्जु शेठ सौदागर यांचा दर्पण दिनाच्या दिवशी पत्रकाराच्या गेवराईला कार्यक्रमासाठी जात असताना गेवराई रस्त्यावर अपघात होऊन त्यांच्या पायाची नस चे ऑपरेशन होऊन मोठी दुखापत झाली असून तरी डॉक्टरांनी त्यांना आराम करण्यासाठी सांगितले असता आराम न करता ते लोकाचया कामासाठी घरी बसून कामे करत असताना दिसून येत आहे.
याबाबत सविस्तर बातमी अशी की, गेवराई तालुक्यातील तलवाडा गावची ग्रामपंचायत मोठी असून तालुक्यात सर्वात जास्त संख्या असलेली म्हणजे 17 सदस्याची ग्रामपंचायत आहे ही ग्रामपंचायत अडवोकेट सुरेश रावजी हत्ते यांच्या वीस वर्षापासून एक हाती सत्ता होती या सत्तेला सुरुंग लावण्यासाठी तलवाडा गावचे उपसरपंच राजुशेठ सौदागर हे खूप तळमळ करताना दिसून येत होते मात्र त्यांची तळमळ पाहून लोकांनी सत्ता राष्ट्रवादीच्या ताब्यात दिली व तालुक्याचे माजी आमदार तथा राष्ट्रवादीचे सरचिटणीस अमरसिंह पंडित साहेब यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून ओळख आहे त्यांच्या एकनिष्ठ चे फळ म्हणून साहेबांनी त्यांना उपसरपंचपदी विराजमान केले
पत्रकार दिनाच्या दिवशी ग्रामपंचायत येथे सर्व सदस्यांची मासिक मीटिंग आवरून गेवराई या ठिकाणी पत्रकार बंधू यांनी सौदागर यांना गेवराई या ठिकाणी कार्यक्रमासाठी निमंत्रण दिले असता मिटिंग आवरून ते घाईघाईत दर्पण दिन साजरा करण्यासाठी गेवराई येथे जात असताना तलवाडा पासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावर असलेले पोईतांदा ते आनंदवाडी या गावाच्या मधोमध एक शाळकरी मुलगा आडवा येत असताना दिसला रस्त्यावर त्यांना वाचवण्यासाठी त्यांची गाडी स्लिप होऊन एका रस्त्याच्या कडेला जाऊन पडली त्यात उपसरपंच सौदागर यांच्या पायाला मोठी होऊन त्यांना गेवराई येथील डॉक्टर कुचेरिया यांच्या हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले त्यानंतर त्यांना बीड वरून सांगण्यात आले की औरंगाबादला जावे लागेल औरंगाबाद येथील लोटस हॉस्पिटल या ठिकाणी त्यांच्या उजव्या पायाचे ऑपरेशन होऊन आराम करण्यासाठी सांगितले
व त्यांचे गावाविषयी व जनतेविषयी असलेली तळमळ पाहता ते घरी बसूनच जनतेची कामे करत असताना दिसून येत आहे व लोकांचे असलेले मूलभूत प्रश्न पाणी, नाली काढणे, रस्त्याविषयी, व व इतर शासकीय कामे लगेच समोरच्या अधिकार्याला फोन लावून तात्काळ लोकांचे प्रश्न सोडवत असताना दिसून येत आहे त्यांच्या कामाचे कौतुक जनतेतून होत आहे