पाच महिन्यांपासून अर्थसहाय्य रखडले निराधारांवर उपासमारीचे संकट प्रश्न निकाली काढण्याची 'गुरुदेव'ची मागणी महसूल कर्मचारीही संपावर

पाच महिन्यांपासून अर्थसहाय्य रखडले

निराधारांवर उपासमारीचे संकट

प्रश्न निकाली काढण्याची 'गुरुदेव'ची मागणी

महसूल कर्मचारीही संपावर

पाच महिन्यांपासून अर्थसहाय्य रखडले

निराधारांवर उपासमारीचे संकट

प्रश्न निकाली काढण्याची ‘गुरुदेव’ची मागणी

महसूल कर्मचारीही संपावर

यवतमाळ : शारीरिक आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्या लोकांना केंद्र शासन पुरस्कृत निराधार योजनेतून दरमहा अर्थसहाय्य दिले जाते परंतु,गेल्या पाच महिन्यापासूनचे अर्थसहाय्य त्यांच्या खात्यात वळते न झाल्याने त्यांच्यावर उपासमारीचे संकट ओढवले आहे त्यातल्या त्यात महसूल कर्मचारीही संपावर गेल्याने त्यांच्या अडचणीत अधिकच वाढ झाली आहे. त्यांची ही परिस्थिती लक्षात घेता त्यांचे अर्थसहाय्य तत्काळ वळते करण्याची मागणी गुरुदेव युवा संघाने केली आहे.

संजय गांधी निराधार, इंदिरा गांधी निराधार, श्रावण बाळ वृद्धपकाळ आदी योजनांतून शारीरिक वा आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्या गरजूंना दरमहा अर्थसहाय्य दिले जाते. या गरजूंमध्ये दिव्यांग,विधवा,निराधार, ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. यातील अनेकांना शारीरिक कामे होत नसून त्यांचा उदरनिर्वाह याच अर्थसाह्ययातून चालतो परंतु गेल्या पाच महिन्यापासून त्यांना अर्थसहाय्य मिळाले नाही. परिणामी त्यांना वेगवेगळ्या आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. इंधन दरवाढीसह जीवनावश्यक वस्तूही महागल्याने या निराधारांचा महागाईत टिकाव लागत नसल्याचे चित्र आहे. शहरी आणि ग्रामीण लाभार्थी असे त्यांचे वर्गीकरण केल्या गेले असून तहसील कार्यालयात या योजनेचे स्वतंत्र कार्यालयसुद्धा आहे.

शहरी लाभार्थ्यांना अर्थसहाय्य वळते झाल्याची माहिती आहे मात्र ग्रामीण लाभार्थी आजही अर्थसहाय्याच्या प्रतीक्षेत आहे. त्यात जुन्या पेंशन योजनेसाठी महसूल कर्मचारी संपावर गेल्याने तहसीलचा कारभार ढेपाळला आहे. तालुक्यातील निराधार,निराश्रित, विधवा,ज्येष्ठ व दिव्यांगांची वस्तुस्थिती लक्षात घेऊन त्यांना त्यांच्या हक्काचे अर्थसहाय्य दिले जावे, अशी मागणी गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम, समाधान रंगारी, भाऊराव वासनिक आदींनी तहसील कार्यालयात ठिय्या देऊन केली आहे. तत्काळ हा प्रश्न निकाली न काढल्यास गुरुदेव युवा संघाचे पदाधिकारी आंदोलन उभे करतील, असा इशाराही देण्यात आला आहे.

: बँकांमध्ये निराधारांच्या चकरा

दरमहा मिळणारे अर्थसहाय्य यावेळी चांगलेच रेंगाळले. खात्यात अर्थसहाय्य वळते का झाले नाही,याची खातरजमा करण्यासाठी महिन्यातून चार वेळा निराधार लाभार्थी बँकेत चकरा मारत आहे. तहसील कार्यालयात त्यांनी विचारणा केल्यास कार्यरत कर्मचारी केंद्राकडून पैसे वळते झाले नसल्याने आम्ही काहीही करू शकत नसल्याचे सांगतात.

Updated : 6 April 2022 4:31 PM GMT

Shubham Gote

Mr. Shubham Gote is involved in the day-to-day operations of the company along with the business expansion strategies of the print media division of the group. He also supervises the performance of the company in terms of the business plans. He has been on the Board of the Company since November 2009.

Leave a Reply

Your email address will not be published.