पांढरकवडा येथे राष्ट्रीय महामार्गावर कंटेनर जळाला

नागपुर वरून हैदराबाद ला जाणाऱ्या ट्रक कंटेनरला काल मध्यरात्री पांढरकवडा राष्ट्रीय महामार्गावर अचानक पेट घेतला. कंटेनरला आग लागल्याचे लक्षात येताच समयसूचकता दाखवत कंटेनर चालकाने महामार्गाच्या बाजूला कंटेनर उभा करून जीवित हानी टाळली. त्यानंतर पांढरकवडा पोलिसांनी येऊन वाहतूक सुरळीत केली,पांढरकवडा नगरपरिषद अग्निशमन दलाने घटनास्थळी घेऊन आग आटोक्यात आणली .आग एवढी भीषण होती की अग्निशमन दलाला आग आटोक्यात आणण्यासाठी कसरत करावी लागली, सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र डायपर घेऊन जात असलेला कंटेनर मधील संपूर्ण माल जळून खाक झाला ,यात लाखोचे रुपयाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आगीचे कारण कळू शकले नाही. अधिक तपास पांढरकवडा पोलीस करीत आहे.
Updated : 7 March 2022 3:42 AM GMT