पांढरकवडा पोलिसांची अवैध दारू वाहतुकीवर करंजी रोड येथे विशेष कारवाई

पांढरकवडा पोलिसांची अवैध दारू वाहतुकीवर करंजी रोड येथे विशेष कारवाई

सविस्तर वृत्त

पांढरकवडा पोलीस स्टेशन वरील कर्तव्यावर असलेले पोलीस उपनिरीक्षक संदीप बारींगे हे दिनांक 2 मार्च च्या पहाटे नाकेबंदी करत असताना, त्यांना स्विफ्ट वाहन क्रमांक MH 29 AD 3206 हे यवतमाळ वरून करंजी येथे अवैध देशी दारूची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. पोलीस उपनिरीक्षक संदीप बारीनगे यांनी पोलिस निरीक्षक जगदीश मंडलवार यांना सदर माहिती देत पोलीस स्टॉप सह करंजी रोड येथील सुरज लोहकरे यांच्या फार्म हाऊस शेतात सापळा रचला. 2 मार्च ला सकाळी साडेपाच वाजता त्यांना पांढ-या रंगाची स्विफ्ट वाहन क्रमांक MH 29 AD 3206 यामधून दोन इसम व सुरज लोहकरे वाहनातून दारूच्या पेट्या विक्री करिता उतरवत होते.

दरम्यान आरोपींना पोलिसांचे कुजबूज लागली तेव्हा तेथून सुरज लोहकरे हा पळून गेला व दोन आरोपी वाहन घेऊन पळून जात असताना पांढरकवडा पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून फार्म हाऊस वरिल शेतातील मातीत वाहन फसल्याने त्यातील एक आरोपी पळून गेला.तर आरोपी वाहन चालक संतोष अर्जुन पुरी वय 29 वर्षे राहणार गिरीनगर यवतमाळ यास ताब्यात घेतले. आरोपीला विचारपूस केली असता साथीदार आकाश उर्फ बारक्या राहणार डोर्ली हा पळून गेला. तर आरोपी संतोष पुरी हा विजय दुमारें राहणार डोर्ली यांच्याकडे काम करत असून त्याच्या सांगण्यावरून स्विफ्ट वाहन क्रमांक MH 29 AD 3206 याद्वारे करंजी येथील सुरज लोहकरे यांना देशी दारू पोहचवत असल्याची कबुली दिली.

पोलीस कार्यवाही व वाहनातून 17 देशी दारू पेट्या तसेच सूरज लोहकरे यांच्या शेतातून 7 देशी दारू पेट्या असे एकूण 3 लाख 69 हजार 120 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून चारही आरोपीं विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा तसेच विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांची बेधडक व यशस्वी सदरची कारवाई यवतमाळ पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप भुजबळ अप्पर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुजलवार यांच्या मार्गदर्शनात पांढरकवडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जगदीश मंडलवार, पोलीस उपनिरीक्षक संदीप बारीनगे, प्रमोद जुनूनकर, उमेश कुमरे,मारुती पाटील ,शशिकांत चांदेकर ,राजू बेलेवार, छंदक मनवर यांनी केली.

Updated : 3 March 2022 2:11 AM GMT

Shubham Gote

Mr. Shubham Gote is involved in the day-to-day operations of the company along with the business expansion strategies of the print media division of the group. He also supervises the performance of the company in terms of the business plans. He has been on the Board of the Company since November 2009.

Leave a Reply

Your email address will not be published.